IND Vs PAK T20 2024: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत काल भारत-पाकिस्तानमध्ये रोमांचक सामना झाला. शेवटच्या ४५ मिनिटात टीम इंडियाने फक्त सामनाच जिंकला नाही, तर क्रिकेट चाहत्यांना खेळाचा सर्वोत्तम थरार अनुभवता आला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला. प्रथम फलंदाजी करून टीम इंडियाने केवळ ११९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ ११३ धावा करू शकला. त्यामुळे भारताचा दणदणीत विजय झाला. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला हा विजय खूप खास आहे. भारताचा विजय झाल्यामुळे क्रिकेट फॅन्स सध्या प्रचंड खुश आहेत. काही जणं तर मीम्सच्या माध्यमातून पाकिस्तानची फिरकी सुद्धा घेतायेत. चला तर मग पाहूया IND vs PAK मॅचवर व्हायरल होणारे टॉप १० मीम्स.

बाप बाप होता…

भारतीय खेळाडूंचं सोशल मीडियावर कौतकच कौतुक

पाकिस्तानची घेतली फिरकी

बुम बुम बमराह…

भारतीय टीमचा जल्लोष

जिंकलोच

बुमराहने असा हिसकावला पाकिस्तानच्या तोंडातला घास

भारताला कमी समजण्याची चूक चुकूनही करु नका

त्यांना आधीच माहिती होतं

हेही वाचा >> Mohammad Rizwan: घरच्यांचा विरोध पण तो ८ वर्ष थांबला अन्…, मोहम्मद रिझवानची लव स्टोरी ऐकून व्हाल अवाक्

भारत-पाकिस्तान यांच्यातील वैर नवीन नाही. मैत्रीसाठी कितीही हात पुढे केले, तरी खेळाच्या मैदानावर या दोन्ही देशांचे खेळाडू जीव तोडून खेळतात. मग तो खेळ कोणताही असो आणि त्यात हा सामना क्रिकेटचा असेल, तर एखाद्या युद्धाप्रमाणे वातावरण निर्माण झालेले असते. चाहत्यांमध्ये तर वेगळीच चुरस आणि चढाओढ रंगते. त्यामुळेच खेळाडूंवरही कमालीचे दडपण येते. अशातच आजच्या सामन्यातही रंगत येणार आहे.