India vs Pakistan Highlights: कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ गडी बाद १७५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ संघर्ष करताना दिसून आला. भारतीय संघाने हा सामना ६१ धावांनी आपल्या नावावर केला.

Live Updates

T20 World Cup 2026 IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्याचे हायलाईट्स 

22:18 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: टीम इंडियाचा विजय

या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव ११४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ६१ धावांनी आपल्या नावावर केला.

22:06 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: पाकिस्तानचे ९ फलंदाज तंबूत! टीम इंडियाला विजयासाठी एका विकेटची गरज

पाकिस्तानला ९वा धक्का बसला आहे. भारतीय संघाला विजयासाठी एक विकेटची गरज आहे.

21:50 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: पाकिस्तान पराभवाच्या उंबरठ्यावर! ७ फलंदाच तंबूत

तिलक वर्माच्या गोलंदाजीवर पाकिस्तानला सातवा मोठा धक्का बसला आहे.

21:41 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: काय बॉल टाकलाय बापू! अक्षरच्या फिरकी घेणाऱ्या चेंडूवर उस्मान खान असा झाला बाद

अक्षर पटेलने टाकलेल्या फिरकी घेणाऱ्या चेंडूवर उस्मान खान ४४ धावा करून माघारी परतला आहे.

21:39 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: १० षटकांचा खेळ पूर्ण

या डावातील १० षटकांचा खेळ पूर्ण झाला असून पाकिस्तानने ४ गडी बाद ७१ धावा केल्या आहेत.

21:19 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: बाबर आला अन् गेला! अक्षर पटेलच्या भन्नाट बॉलवर असा झाला बाद

अक्षर पटेलने बाबर आझमला अवघ्या ५ धावांवर त्रिफळाचित करत माघारी धाडलं आहे.

21:07 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: बुमराह मॅजिक! एकाच ओव्हरमध्ये घेतल्या २ विकेट्स

जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात पाकिस्तानला २ मोठे धक्के दिले आहेत. सईम अयुब ६ धावांवर माघारी परतल्यानंतर, कर्णधार सलमान अली आघा अवघ्या ४ धावा करून माघारी परतला.

21:02 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: बुमराहच्या भन्नाट यॉर्करवर सईम अयुबची बत्तीगुल

बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात सईम अयुबला वेगवान यॉर्कर टाकून ६ धावांवर माघारी धाडलं आहे.

20:58 (IST) 15 Feb 2026
IND vs PAK Live: पाकिस्तानला पहिल्याच षटकात मोठा धक्का! साहिबजादा परतला माघारी

पाकिस्तानला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. साहिबाजादा शून्यावर माघारी परतला आहे.

20:44 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: भारताने पाकिस्तानविरूद्ध उभारली सर्वोच्च धावसंख्या! विजयासाठी दिलं इतक्या धावांचं आव्हान

भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना १७५ धावा केल्या आहेत. ही टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध खेळताना उभारलेली सर्वोच्च धावसंख्या आहेत. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १७६ धावा करायच्या आहेत.

20:35 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live:उस्मान तारिकच्या जाळ्यात अडकला सूर्यकुमार यादव! असा झाला बाद

सूर्यकुमार यादवला उस्मान तारिकने बाद करत माघारी धाडलं आहे. सूर्याने ३२ धावांची खेळी केली.

20:14 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live:भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का! हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर बाद

भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.

20:13 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: भारतीय संघाला तिसरा धक्का! तिलक वर्मा परतला माघारी

भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. तिलक वर्मा २५ धावांवर माघारी परतला आहे.

20:07 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: १४ षटकांचा खेळ पूर्ण

भारतीय संघाने १४ षटकांअखेर २ गडी बाद १२५ धावा केल्या आहेत.

19:55 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: तिलक वर्माचा खणखणीत षटकार! टीम इंडियाच्या १०० धावा पूर्ण

भारतीय संघाने १२ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

19:44 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: इशान किशनचं शतक हुकलं! इतक्या धावा करत परतला माघारी

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ७७ धावांची खेळी केली. पण सईम अयुबच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित होऊन माघारी परतला आहे.

19:30 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: पॉवरप्लेमध्ये इशान किशनची तुफान फटकेबाजी! अवघ्या इतक्या चेंडूत झळकावलं अर्धशतक

पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना इशान किशनने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

19:04 (IST) 15 Feb 2026

अभिषेक शर्मा तंबूत

सलमान अली अघाचा पहिलं षटक टाकायचा निर्णय पाकिस्तानसाठी यशस्वी ठरला आहे. फिरकीपटू सलमानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारायचा प्रयत्न शाहीन शहा आफ्रिदीच्या हातात जाऊन विसावला. अभिषेकला भोपळाही फोडता आला नाही. पोटाच्या दुखण्यातून बरं होत अभिषेकने पुनरागमन केलं होतं.

19:02 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: पाकिस्तानची फिरकीने सुरुवात

पाकिस्तानने फिरकीपटूला पहिलं षटक देण्याचा प्रयोग केला आहे. कर्णधार सलमान अली अघाने पहिलं षटक टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

18:40 (IST) 15 Feb 2026

दोन्ही संघ कसे आहेत?

दोन्ही संघ

भारतीय संघ

अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह</p>

पाकिस्तान संघ

साहिबजादा फरहान, सईम अयुब, सलमान अली अघा, बाबर आझम, शदाब खान, उस्मान खान, मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, शाहीन शहा आफ्रिदी, उस्मान तारीक, अबरार अहमद

18:36 (IST) 15 Feb 2026

अभिषेक शर्मा, कुलदीप यादव अंतिम अकरात

धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांचा भारतीय संघाने अंतिम अकरात समावेश केला आहे.

18:34 (IST) 15 Feb 2026

पाकिस्तानने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत पाकिस्तानने टॉस जिंकला असून त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

18:14 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: टीम इंडिया हँडशेक करणार नाही

टी२० वर्ल्डकपच्या कोलंबोतल्या लढतीदरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. सर्वसाधारणपणे टॉसच्या वेळी दोन्ही कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करतात. सामना संपल्यानंतर शिष्टाचाराचा भाग म्हणून खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. मात्र भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध यापैकी काहीही करणार नसल्याचं समजतं. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन केलं नाही. या भूमिकेवर जोरदार टीकाही झाली आणि अनेकांनी त्याला पाठिंबाही दर्शवला. हीच भूमिका टीम इंडिया टी२० वर्ल्डकपमध्येही कायम राखणार आहे.

17:29 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: प्रेमदासाची खेळपट्टी संथ

कोलंबोची आर.प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी संथ आणि धीमी आहे. भारतातल्या खेळपट्ट्यांवर सहजपणे धावा होतात तसं तिथे होत नाहीत.

17:27 (IST) 15 Feb 2026
IND vs PAK Live: उस्मान तारीक टीम इंडियासाठी डोकेदुखी?

२८वर्षीय उस्मान तारीक टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. पाकिस्तानससाठी त्याे ४ टी२० सामन्यात त्याने ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची अ‍ॅक्शन अनोखी आहे. रनअपमध्ये तो क्षण थांबतो. मात्र त्याची अ‍ॅक्शन नियमानुसार आहे.

15:58 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK Live: अभिषेक शर्मा पुनरागमन करणार?

नामिबियाविरूद्धच्या सामन्याआधी अभिषेक शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. पण तो फिट झाला असून पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पुनरागमन करणार असल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे.

15:24 (IST) 15 Feb 2026

IND vs PAK: आज रंगणार भारत -पाकिस्तान सामना

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेासामने येणार आहेत. हा सामना कोलंबोत खेळवला जाणार आहे.

IND vs PAK Weather Report Sri lanka T20 World Cup 2026 News in marathi

T20 World Cup 2026 IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्याचे हायलाईट्स