India vs Pakistan U19 Asia Cup 2024 Live Cricket Streaming: २९ नोव्हेंबरपासून युएई येथे १९ वर्षाखालील आशिया चषक (U-19 Asia Cup 2024) स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाच्या मोहिमेला शनिवारपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होणार आहे आणि भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी एक मजबूत संघ जाहीर केला आहे, ज्याच्या नेतृत्त्वाची जबाबदारी मोहम्मद अमानच्या हातात असेल. आयपीएल लिलावात सर्वांचं लक्ष वेधून घेणारा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीही या सामन्यात खेळणार आहे, त्याला राजस्थान रॉयल्सने नुकत्याच पार पडलेल्या मेगा लिलावात १.१ कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावात निवड झालेला वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. भारतीय संघात आशिया चषकात अ गटात असून पाकिस्तान, जपान आणि संयुक्त अरब अमिराती हे देशही आहेत.

IND vs PAK: भारत वि पाकिस्तान किती वाजता सुरू होणार?

दोन्ही संघांमधील हा अटीतटीचा सामना ३० नोव्हेंबर म्हणजे आज होणार असून हा सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. जो दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – Indian Team New ODI Jersey: टीम इंडियाचा नवा अवतार, भारतीय संघ आता नव्या जर्सीमध्ये दिसणार; लाँचिंगचा व्हिडीओ पाहिलात का?

IND vs PAK: भारत वि पाकिस्तान सामना कुठे लाईव्ह पाहता येणार?

दोन्ही संघांमधील अंडर-१९ आशिया चषक सामना भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल, तर सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी लिव्हवर असेल. पाकिस्तान, नेपाळ आणि इतर देशांतील चाहत्यांसाठी ACC च्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

हेही वाचा – Glenn Phillips Flying Catch: क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट झेल? ‘सुपरमॅन’ फिलीप्सने हवेत झेप घेत टिपला अनपेक्षित कॅच, VIDEO व्हायरल

भारत-पाकिस्तानचे संघ

भारतीय संघ
आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, प्रणव पंत, हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक), अनुराग कवडे (यष्टीरक्षक), हार्दिक राज, मोहम्मद अन्नान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, के.पी. चेतन शर्मा, निखिल कुमार.

पाकिस्तान संघ

साद बेग (कर्णधार/यष्टीरक्षक), मोहम्मद अहमद, हारून अर्शद, तय्यब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नावेद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रझा, मोहम्मद रियाजुल्ला, अब्दुल सुभान, फरहान युसूफ , उमर जायब.

Story img Loader