India vs Pakistan, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील हा आठवा सामना आहे. टीम इंडियाचा रेकॉर्ड ७-० असा आहे. हाय व्होल्टेज सामन्यादरम्यान विराट कोहली जुनी एकदिवसीय जर्सी घालून बाहेर आला. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना सुरू झाला आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक चूक केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेली जुनी एकदिवसीय जर्सी घालून मैदानात उतरला होता. त्याचे या जुन्या जर्सीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल
Virat Kohli & Anushka Sharma visit premanand ji maharaj at vrindavan
Video : विराट कोहली सहकुटुंब पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांशी काय संवाद झाला? अनुष्का शर्मा म्हणाली, “अनेक प्रश्न…”
Rohit Sharma Completes 14 Years With Mumbai Indians Franchise Shared Special Video for Hitman
Rohit Sharma: IPL 2025 पूर्वी अचानक मुंबई इंडियन्सला आली रोहित शर्माची आठवण, शेअर केला खास VIDEO; काय आहे कारण?
Sam Konstas Reveals Chat with Virat Kohli After On Field Collision Between them
Konstas on Virat Kohli: धक्काबुक्की प्रकरणानंतर कॉन्स्टासने घेतली कोहलीची भेट, म्हणाला; “विराट कोहली माझा आदर्श…”

भारतीय क्रिकेट संघाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने क्षेत्ररक्षण करताना पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेली जर्सी घातली होती, पण एका षटकानंतरच त्याच्या लक्षात आले. यादरम्यान तो पॅव्हेलियनकडे बोट दाखवतानाही दिसला. मात्र, पुढच्याच षटकात त्याने पुन्हा तिरंगा पट्टी असलेली नवी जर्सी घातली. काही सोशल मीडिया यूजर्सनी कोहलीचा जुनी जर्सी घातलेला फोटोही पोस्ट केला आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.

बाबर आझम-मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावरला

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी पाकिस्तानी डावाची धुरा सांभाळली. भारत तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे. दोघांनी ७५ चेंडूत ५२ धावांची झाली आहे. पाकिस्तानने २२ षटकात २ बाद ११४ धावा केल्या आहेत. बाबर ३२ आणि रिझवान २५ धावांवर नाबाद आहे.

हेही वाचा: IND vs PAK: भारताविरुद्धचा सामना पाकिस्तान गमावल्यास बाबर आझमचे कर्णधारपद धोक्यात? म्हणाला, “जेवढे अल्लाहने…”

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत: शुबमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

Story img Loader