IND vs SA 1st ODI Live Updates in Marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात असून शुबमन गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचं नेतृत्त्व करत आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा हे दिग्गज खेळाडू संघात परतले आहेत.

भारताने द. आफ्रिकेवर कसा मिळवला विजय? वाचा संपूर्ण बातमी

IND vs SA: भारताचा द. आफ्रिकेवर अखेरच्या षटकात रोमांचक विजय, कुलदीपचं षटक ठरलं टर्निंग पॉईंट

अर्शदीपच्या खात्यात विकेट

अर्शदीप सिंगने ४७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर नांद्रे बर्गरला झेलबाद केलं आणि त्या षटकात एकही धाव दिली नाही. यासह आता भारताला विजयासाठी एका विकेटची गरज आहे. तर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८ चेंडूंत ३८ धावांची गरज आहे.

भारत-द. आफ्रिका वनडे रोमांचक वळणावर

द. आफ्रिकेने ४५ षटकांत ८ बाद ३०७ धावा केल्या आहेत. यासह मैदानावर कार्बिन बॉश ४६ धावांवर खेळत आहे. तर बॉश १५ धावांवर आहे. यासह द. आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूत ४४ धावांची गरज आहे.

कुलदीपने एका षटकात घेतले दोन विकेट

कुलदीप यादवला ३४वं षटक टाकण्याची जबाबदारी दिली. यानंतर कुलदीपने पहिल्या चेंडूवर मार्काे यान्सनला झेलबाद केलं. कुलदीपच्या फिरकीवर मोठा फटका खेळणं यान्सनला महागात पडलं. यानंतर आलेल्या कार्बिन बॉशने एक धाव घेत ब्रिट्झकेला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर ब्रिट्झके मोठा फटका खेळायला गेला आणि तो देखील झेलबाद झाला. यासह ९७ धावांची भागीदारी करत असलेले सेट फलंदाज ३ चेंडूत माघारी परतले आणि कुलदीपने सामनाच फिरवला.

मार्काे यान्सन ब्रिटझकेची भागीदारी

मॅथ्यू ब्रिटझके व मार्काे यान्सन यांनी वादळी फटकेबाजी करत भारतीय संघाची झोप उडवली आहे. यान्सनने २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं असून सध्या ब्रिट्झके व यान्सन यांची भागीदारी ९७ वर पोहोचली आहे. यासह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १०८ चेंडूत १२७ चेंडूंची गरज आहे.

आफ्रिकेची भंबेरी

हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची भंबेरी उडाली आहे. हर्षित राणाने रायल रिकलटन आणि क्विंटन डी कॉक यांना बाद केलं तर अर्शदीपने एडन मारक्रमचा अडथळा दूर केला.

दक्षिण आफ्रिकेसमोर ३५० धावांचं आव्हान

विराट कोहलीच्या ५२व्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने ३४९ धावांची मजल मारली. रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी अर्धशतकी खेळी करत विराटला चांगली साथ दिली. आफ्रिकेतर्फे मार्को यान्सन, नांद्रे बर्गर, कार्बिन बॉश आणि ओटनील बार्टमन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

कर्णधार राहुलची अर्धशतकी खेळी

सुरुवातीला चाचपडत खेळणाऱ्या राहुलने ५६ चेंडूत ६० धावांची खेळी केली.

विराट कोहलीची मॅरेथॉन खेळी

शतकानंतर जोरदार फटकेबाजी केल्यानंतर विराट कोहली बाद झाला. उष्ण आर्द्र वातावरणात शतक साकारलेल्या कोहलीला थोडा पाठदुखीचा त्रास जाणवला. मैदानातच त्याने उपचार घेतले. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कोहली बाद झाला. त्याने १३५ धावांची दमदार खेळी केली.

विराट कोहलीचं ५२वं शतक

मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर सुरेख चौकार लगावत विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील ५२व्या शतकाची नोंद केली. शतकानंतर लगेचच विराटने फिरकीपटू सुब्रयानच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार वसूल केले.

भारताच्या २०० धावा पूर्ण अन् सुंदर झेलबाद

भारतीय संघाने ३१व्या षटका २०० धावांचा टप्पा गाठला. यानंतर बार्टमनच्या पुढच्याच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर झेलबाद झाला. तर विराट कोहली ८८ धावा करत मैदानावर कायम आहे.

ऋतुराज गायकवाड झेलबाद

ऋतुराज गायकवाडला बाद करण्यासाठी डेवाल्ड ब्रेविसने उजव्या बाजूला झेप घेत एका हाताने कमालीचा झेल टिपला. विराटदेखील हा झेल पाहून आश्चर्यचकित झाला. यासह ऋतुराज ८ धावा करत झेलबाद झाला.

२५ षटकांत भारताने किती धावा केल्या?

रोहितच्या विकेटनंतर विराट-ऋतुरातने भारताचा डाव पुढे नेला आहे. यासह विराट कोहली ८३ धावांसह शतकाच्या दिशेने जात आहे. तर २५ षटकांत भारताने २ बाद १७९ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा झेलबाद

यान्सनने २२व्या षटकात रोहित शर्माला पायचीत करत बाद केलं. यासह रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा झेलबाद झाला. यासह रोहित विराटची १०८ चेंडूत १३६ धावांची भागीदारी तुटली.

रोहित शर्माचं शानदार अर्धशतक

रोहित शर्माने ४३ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह वनडेमधील ६०वं अर्धशतक झळकावलं आहे. हे रोहित शर्माचं वनडेमधील सलग तिसरं अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत २ त्यानंतर आता रोहितने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अर्धशतक झळकावत हॅटट्रिक साधली आहे.

विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीचं ४८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह शानदार अर्धशतक झळकावलं आहे. विराटचं वनडेमधील हे ७६वं अर्धशतक आहे. यासह रोहित-विराटच्या जोडीने ८७ चेंडूत शतकी भागीदारी रचली आहे. यासह भारताची धावसंख्या १८ षटकांत १ बाद १४० धावा अशी आहे.

रोहित-विराटची अर्धशतकी भागीदारी

रोहित शर्मा व विराट कोहलीच्या जोडीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला आहे. यासह त्यांनी ३९ चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली आहे. यासह १० षटकांत भारताने १ बाद ८० धावा केल्या आहेत. रोहित २० धावा तर विराट कोहली ३० धावांवर खेळत आहे.

रो-कोची जोडी मैदानात

विराट कोहलीने बर्गरच्या गोलंदाजीवर येताच चौकार लगावत खातं उघडलं. याच चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहितने पूल शॉट खेचला, पण सीमारेषेच्या जवळ टोनी डी झॉर्झीने तिथे तैनात होता आणि त्याने झेल टिपलाच होता, पण त्याच गुडघा मैदानावर अडकल्याने चेंडू हातात निसटला रोहितला एका धावेवर जीवदान मिळालं.

भारताला पहिला धक्का

भारताला चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. नांद्रे बर्गरने टाकलेला चेंडू यशस्वी जैस्वालच्या बॅटची हलकीशी कड घेत विकेटच्या मागे गेला आणि तो झेलबाद झाला. यासह २५ धावांवर भारताला पहिला धक्का बसला.

पहिल्या वनडे सामन्याला सुरूवात

यशस्वी जैस्वालने मार्काे यान्सनच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सामन्याला सुरूवात केली आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन

रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), एडन मारक्रम(कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर, ओटनील बार्टमन

नाणेफेक

भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे सामन्याची नाणेफेक द. आफ्रिका संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. तेंबा बावुमा व केशव महाराजला विश्रांती देण्यात आली आहे. तर भारतीय संघात ऋषभ पंतला संधी देण्यात आली नाही.