IND vs SA ODI Match Timing Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीया मालिका खेळवली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी मालिका २-०ने आपल्या नावे केली आणि भारतीय संघाला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. आता वनडे मालिकेतून या पराभवाचा बदला घेण्यासाठी केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ उतरणार आहे. पण हे सामने किती वाजता सुरू होणार, जाणून घेऊया.
कर्णधार शुबमन गिल व उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या मालिकेबाहेर असल्याने केएल राहुलच्या खांद्यावर संघाची संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजाही या संघाचा भाग असतील. तर जसप्रीत बुमराहला या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर अष्टपैलू हार्दिक पंड्याही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका ३० नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीसह अनेक खेळाडू आधीच रांचीमध्ये पोहोचले आहेत. रोहित शर्मा व विराट कोहली नेट्समध्ये सराव करतानाचे व्हीडिओ पाहायला मिळाले आहेत. हे दोघेही दिग्गज वर्षभरानंतर घरच्या मैदानावर खेळताना दिसणार आहेत.
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड (IND vs SA ODI Series Head to Head)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी आतापर्यंत ९४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. द. आफ्रिका संघाने यापैकी ५१ सामने जिंकले आहेत, तर भारताने ४० सामने जिंकले आहेत. भारतीय भूमीवर, दोन्ही संघांमध्ये ३२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान भारताने १८ सामने जिंकले आहेत तर १४ सामने गमावले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामना दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. तर नाणेफेकही दुपारी १ वाजता होईल. तर ही वनडे मालिका टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल, तर जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचं वेळापत्रक
३० नोव्हेंबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली वनडे – रांची
३ डिसेंबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका दुसरी वनडे – रायपुर
६ डिसेंबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका तिसरी वनडे – विशाखापट्ट्णम
वनडे मालिकेसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
तेंबा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रिट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, रुबिन हरमन, केशव महाराज, मार्को यान्सन, एडन मारक्रम, लुंगी एनगिडी, रायन रिकल्टन, प्रेनेलन सुब्रायन
