India vs South Africa 1st T20 Highlight: भारताने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी मोठा पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २० षटकांत ८ विकेट गमावत २०२ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिले.

भारताने दिलेल्या २०३ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना यजमान संघाने १७.५ षटकांत १४१ धावा केल्या आणि ६१ धावांनी पराभव पत्करावा लागला. संघाची पहिली विकेट ८ धावा करून बाद झालेल्या एडन माक्ररमच्या रूपात पडली. ट्रिस्टन स्टब्सने ११ चेंडूत ११ धावा केल्या आणि तो झेलबाद झाला. क्लासेनने २५ तर रायनने २१ धावांची खेळी केली. या सामन्यात डेव्हिड मिलरने १८ धावा केल्या तर पॅट्रिक क्रुगर १ धावा काढून बाद झाला. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी ३-३ विकेट घेतले. याशिवाय आवेश खानला २ तर अर्शदीप सिंगला एक विकेट मिळाली.

भारताला पहिला झटका अभिषेक शर्माच्या रूपाने बसला जो ७ धावा करून झेलबाद झाला. संजू सॅमसनने २७ चेंडूत षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने १७ चेंडूत २१ धावा केल्या आणि तो झेलबाद झाला. यानंतर संजूने ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तिलक वर्माने ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि तो बाद झाला. संजूने या सामन्यात १०७ धावांची खेळी खेळली आणि नंतर तो बाद झाला. हार्दिक पांड्या २ धावा करून बाद झाला. या सामन्यात रिंकू सिंगने ११ धावांची खेळी केली आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षर पटेलने ७ धावा केल्या.

Live Updates

IND vs SA 1st T20I Highlights in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स

00:17 (IST) 9 Nov 2024
IND vs SA: भारताचा दणदणीत विजय

भारताने दक्षिण आफ्रिकेला १४१ धावांवर सर्वबाद करत पहिल्या टी-२० सामन्यात ६१ धावांनी विजय मिळवला. भारताच्या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रत्येकी ३ विकेट घेतले. चक्रवर्तीने ३ मोठे विकेट घेत संघाला विजयाच्या जवळ नेलं. तर संजू सॅमसनच्या शतकाने भारताच्या विजयाच्या पाया रचला.

00:17 (IST) 9 Nov 2024
IND vs SA: रनआऊट

१७व्या षटकात केशव महाराज आणि कोएत्झी धाव चोरण्याचा प्रयत्न करत होते पण सूर्याच्या हातात चेंडू येताच त्याने थेट स्टंपवर मारला आणि कोएत्झी धावबाद झाला. सूर्याचा रॉकेट थ्रो कमालीचा होता.

00:01 (IST) 9 Nov 2024
IND vs SA: कोएत्झीचे षटकार

पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा विजय निश्चित असला तरी गेराल्ड कोएत्झी त्याच्या फटकेबाजीने सामना अधिक रंजक करत आहे. कोएत्झीने १६व्या षटकात सलग दोन षटकार लगावत संघाच्या धावसंख्येत भर घातली आहे. भारताला आता विजयासाठी २ विकेट्सची आवश्यकता आहे.

23:58 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: आठवी विकेट

षटकार लगावणाऱ्या मार्को यान्सनला रवी बिश्नोईने अखेरच्या चेंडूवर बाद करत भारताची डोकेदुखी कमी केली. यान्सने १२ धावा करत मोठे फटके खेळत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. बिश्नोईनेही या विकेटसह आपले ३ विकेट पूर्ण केले. आफ्रिकेने यासह १५ षटकांत ८ बाद ११४ धावा केल्या आहेत.

23:45 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: रवी बिश्नोई

वरूण चक्रवर्तीनंतर पुढच्या षटकात बिश्नोईने २ विकेट्स मिळवले. पहिल्याच चेंडूवर पॅट्रिक क्रुगर तर पाचव्या चेंडूवर सिमेलेनला पायचीत केले. पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या सिमेलेनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. अशारितीने १०० धावांच्या आता आफ्रिकेने ७ विकेट्स गमावले आहेत.

23:39 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: वरूण चक्रवर्तीच्या ३ विकेट्स

वरूण चक्रवर्तीने १२व्या षटकात तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर क्लासेन आणि मिलरला झेलबाद करत भारताला विजय जवळपास निश्चित करून दिला आहे. भेदक गोलंदाजी करत वरूणने ३ विकेट्स घेतल्या आहेत.

23:36 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: वरूण चक्रवर्ती-रवी बिश्नोईची उत्कृष्ट गोलंदाजी

बिश्नोई आणि वरूण चक्रवर्ती उत्तम गोलंदाजी करत क्लासेन आणि मिलरवर चांगलीच पकड घट्ट केली. १०व्या आणि ११ व्या षटकात या दोघांनी २ आणि १ धाव देत धावांवर अंकुश ठेवला.

23:15 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: वरूण चक्रवर्तीच्या खात्यात पहिली विकेट

वरूणच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर रिकेल्टन सीमारेषेजवळ झेलबाद झाला. यासह आफ्रिकेला तिसरा धक्का बसला आहे, रिकेल्टन मैदानात सेट होऊ पाहत असतानाच वरूणच्या जाळ्यात अडकला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. अशारितीने आफ्रिकेने ३ बाद ४९ धावा केल्या आहेत.

23:01 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: आफ्रिकेला दुसरा धक्का

आवेश खानच्या चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स ११ धावा करत झेलबाद झाला. यासह आफ्रिकेला दुसरा धक्का बसला आहे. आफ्रिकेने ४ षटकांत २ बाद ४१ धावा केल्या आहेत.

22:49 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: स्टब्सला दिली एक धाव

मारक्रम बाद झाल्यानंतर स्टब्स फलंदाजीसाठी आला. अर्शदीपच्या अखेरच्या चेंडूवर रिकेल्टन आणि स्टब्सने २ धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण स्टब्सने अर्धवट धाव घेतल्याने पंचांनी १ धाव ग्राह्य धरली. यासह पहिल्या षटकात आफ्रिकेने १ बाद १० धावा केल्या.

22:46 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: आफ्रिकेला पहिला धक्का

अर्शदीपच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन चौकार लगावत मारक्रमने चांगली सुरूवात केली. पण चौथ्या चेंडूवर बॅटची कड घेत चेंडू थेट सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये पोहोचला. यासह आफ्रिकेने पहिल्याच षटकात महत्त्वपूर्ण विकेट गमावली.

22:20 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: आफ्रिकेसमोर इतक्या धावांचे लक्ष्य

संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ९ बाद २०२ धावा केल्या आहेत. यासह भारताने आफ्रिकेला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिले आहे. संजू सॅमसनच्या विकेटनंतर भारताची खालची फळी फार काळ मैदानावर टिकू शकली नाही. पण भारताच्या टॉप ऑर्डरने चांगली फलंदाजी करत धावसंख्या उभारली होती. हार्दिक, रिंकू, अक्षर पटेल हे फलंदाज झटपट बाद झाले तर रवी बिश्नोई अखेरच्या चेंडूवर धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला.

22:12 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: भारताने गमावली सातवी विकेट

मार्को यान्सेनच्या अखेरच्या षटकात मोठा फटका खेळताना अक्षर पटेल सीमारेषेजवळ झेलबाद झाला. अक्षर ७ धावा करत बाद झाला.

22:10 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: हार्दिक पंड्या झेलबाद

संजूनंतर पुढच्याच कोएत्झीच्या षटकात हार्दिक पंड्या झेलबाद झाला. तर १९व्या षटकातील कोएत्झीच्या पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगही ११ धावा करत झेलबाद झाला. यासह भारतीय संघ २०० धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे. पण भारताच्या दोन्ही फिनिशरला फार धावा करण्याची संधी नाही मिळाली.

21:52 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: संजू सॅमसन झेलबाद

१६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर संजूने मोठी बाऊंड्री असलेल्या मैदानाच्या कोनात षटकार लगावला आणि झेलबाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने सीमारेषेजवळ एक जबरदस्त झेल टिपला. संजू ५० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांसह १०७ धावा करत बाद झाला.

21:50 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: तिलक वर्मा झेलबाद

केशव महाराजच्या १५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तिलक वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तिलकने महत्त्वपूर्ण ३३ धावांची खेळी केली.

21:48 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: संजू सॅमसन शतक

संजू सॅमसनने अवघ्या ४७ चेंडूत ९ षटकार आणि ७ चौकारांसह झंझावाती शतक झळकावले आहे. संजूचे हे सलग दुसरे शतक आहे. संजूच्या शतकासह भारताची धावसंख्या ३ बाद १६७ वर पोहोचली आहे.

21:37 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: संजूची वादळी फलंदाजी

संजू सॅमसनने डर्बनच्या मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडला आहे. सूर्याने विस्फोटक फलंदाजी करत भारताची धावसंख्या १०० पार नेली असून सलग दुसरे शतक झळकावण्याच्या जवळ आहे. १३ षटकात भारताने २ बाद १४३ धावा केल्या आहेत.

21:21 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: सूर्यकुमार यादव झेलबाद

नवव्या षटकातील क्रुगरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. सूर्या २२ धावा करत बाद झाला. भारताेने ९ षटकांत २ बाद ९० धावा केल्या आहेत.

21:07 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: संजू सॅमसन अर्धशतक

संजू सॅमसनने २७ चेंडूत ५० धावा करत आपले झंझावाती अर्धशतक झळकावले आहे. सूर्याने आठव्या षटकात सलग दोन षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव त्याला दुसऱ्या टोकावरून साथ देत आहे. यासह भारताने ८ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या आहेत.

20:59 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: पॉवरप्ले

सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनच्या जोडीने पॉवरप्लेपर्यंत १ बाद ५६ धावा केल्या आहेत. सॅमसन ३६ तर सूर्या २२ धावांवर खेळत आहे.

20:56 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: संजू-सूर्याची तुफान फटकेबाजी

संजू सॅमसन आणि सूर्यकुमारने मार्को यान्सनच्या पाचव्या षटकात १५ धावा कुटल्या. संजूने १० धावा तर सूर्याने चौकार लगावत चांगली फटकेबाजी केली. यासह भारताने ५ षटकांत १ बाद ४९ धावा केल्या आहेत.

20:51 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: अभिषेक शर्मा झेलबाद

गेराल्ड कोएत्झीच्या चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी गेलेला अभिषेक शर्मा झेलबाद झाला आहे. अभिषेकच्या बॅटची कड घेत चेंडू हवेत उडाला आणि मारक्रमने उलटा धावत जात एक अफलातून झेल टिपला आहे.

20:44 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: ३ षटकांनंतर भारताची धावसंख्या

संजू सॅमसनने तिसऱ्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर चौकार षटकार लगावत चांगली सुरूवात केली. अशारितीने भारताने पहिल्या ३ षटकांत बिनबाद २४ धावा केल्या आहेत.

20:39 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: दुसऱ्या षटकात पहिला चौकार

मार्काे यान्सनच्या पहिल्या षटकात भारताने २ धावा केल्या तर कर्णधार मारक्रमच्या दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर सामन्यातील पहिला चौकार लगावला. तर चौथ्या चेंडूवर संजूने चौकार लगावला.

20:34 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: सामन्याला सुरूवात

भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून संजू सॅमसन आणि संजू सॅमसनची जोडी मैदानात आहे. तर आफ्रिकेकडून मार्को यान्सन गोलंदाजी करत आहे.

20:10 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: भारत (प्लेइंग इलेव्हन):

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान

https://twitter.com/BCCI/status/1854895862155210979

20:09 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):

रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर

20:01 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: नाणेफेक

भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याची नाणेफेक आफ्रिकेने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला असंही प्रथम फलंदाजी करायची होती असं सूर्याने म्हटलं आहे.

19:55 (IST) 8 Nov 2024
IND vs SA: थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याची नाणेफेर ८.०० वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं एक मोठे आव्हान असते. त्यामुळे नाणेफेक जिंकून संघ फलंदाजी की गोलंदाजी निवडणं यावर नजरा असणार आहेत.

IND vs SA 1st T20I Highlights in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेची सुरूवात भारताने विजयासह केली आहे. पहिल्यात सामन्यात भारताने आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव केला.

Story img Loader