scorecardresearch

Premium

IND vs SA 1st T20: भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका निष्प्रभ! आठ गडी राखून विजय, मालिकेत १-० आघाडी

सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे.

IND vs SA 1st T20: South Africa ineffective against Indian bowling! Win by eight wickets, lead the series 1-0
सौजन्य- बीसीसीआय

IND vs SA: सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सर्वच भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विजयासाठी मिळालेले १०७ धावांचे आव्हान भारताने दोन गडी गमावत गाठले. धारदार गोलंदाजी करणारा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सामन्याचा मानकरी ठरला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील भारत दौऱ्यातील मालिकेला तिरुअनंतपुरम येथे खेळला त्यात भारतीय संघाने आज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम केले. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतलेला निर्णय दीपक चहर अर्शदीप सिंग यांनी सार्थ ठरवला. त्यांनी अवघ्या २.३ षटकात दक्षिण आफ्रिकेचे पहिले पाच गडी बाद केले. त्यानंतर ऐडन मार्करम व वेन पार्नेल यांनी संघाचा डाव सावरला. ते अनुक्रमे २५ व २४ धावा करत बाद झाले.

akshar patel
World Cup 2023 : दुखापतीमुळे ऑलराऊंडर अक्षर पटेल संघाबाहेर, रवीचंद्रन अश्विन वर्ल्डकप संघात
Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?
Ashwin batting practice video Viral
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर रविचंद्रन आश्विनने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
IND vs AUS 1st ODI: India win the toss and decide to bowl Ashwin-Shreyas Iyer return to the squad see playing 11
IND vs AUS 1st ODI: भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; अश्विन-श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन, पाहा प्लेईंग-११

निम्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका संकटात सापडली होती पण केशव महाराजने एक बाजू लढवत ठेवत त्याने ३५ चेंडूत ४१ धावा केल्या. आफ्रिकेची फलंदाजी ही सुमार दर्जाची झाली असून पत्त्याच्या बंगल्यासारखी त्याचे गडी बाद झाले. तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत होते आता मात्र भारत वरचढ ठरताना दिसतो. भारतासाठी अर्शदीपने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या १०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्मा खातेही न खोलता तंबूत परतला. अनुभव विराट कोहली यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र, तोदेखील ३ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या दोन षटकार ठोकत पटकन धावगती वाढवली. त्यानंतर मात्र राहुल व सूर्य कुमारने काही सांभाळून खेळ केला. नजर बसल्यानंतर मात्र त्यांनी चौकार षटकार ठोकत भारताचा विजय आवाक्यात आणला. सूर्यकुमारने यादरम्यान आपले ८ वे अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस राहुलने विजयी षटकारासह अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sa 1st t20 south africa ineffective against indian bowling win by eight wickets lead the series 1 0 avw

First published on: 28-09-2022 at 22:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×