IND vs SA 1st T20: South Africa ineffective against Indian bowling! Win by eight wickets, lead the series 1-0 avw 92 | Loksatta

IND vs SA 1st T20: भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका निष्प्रभ! आठ गडी राखून विजय, मालिकेत १-० आघाडी

सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे.

IND vs SA 1st T20: भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका निष्प्रभ! आठ गडी राखून विजय, मालिकेत १-० आघाडी
सौजन्य- बीसीसीआय

IND vs SA: सुर्यकुमार आणि केएल राहुलच्या शानदार फलंदाजीने भारतीय संघाने आठ गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सर्वच भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विजयासाठी मिळालेले १०७ धावांचे आव्हान भारताने दोन गडी गमावत गाठले. धारदार गोलंदाजी करणारा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सामन्याचा मानकरी ठरला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील भारत दौऱ्यातील मालिकेला तिरुअनंतपुरम येथे खेळला त्यात भारतीय संघाने आज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम केले. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतलेला निर्णय दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी सार्थ ठरवला. त्यांनी अवघ्या २.३ षटकात दक्षिण आफ्रिकेचे पहिले पाच गडी बाद केले. त्यानंतर ऐडन मार्करम व वेन पार्नेल यांनी संघाचा डाव सावरला. ते अनुक्रमे २५ व २४ धावा करत बाद झाले.

निम्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका संकटात सापडली होती पण केशव महाराजने एक बाजू लढवत ठेवत त्याने ३५ चेंडूत ४१ धावा केल्या. आफ्रिकेची फलंदाजी ही सुमार दर्जाची झाली असून पत्त्याच्या बंगल्यासारखी त्याचे गडी बाद झाले. तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत होते आता मात्र भारत वरचढ ठरताना दिसतो. भारतासाठी अर्शदीपने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या १०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्मा खातेही न खोलता तंबूत परतला. अनुभव विराट कोहली यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र, तोदेखील ३ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या दोन षटकार ठोकत पटकन धावगती वाढवली. त्यानंतर मात्र राहुल व सूर्य कुमारने काही सांभाळून खेळ केला. नजर बसल्यानंतर मात्र त्यांनी चौकार षटकार ठोकत भारताचा विजय आवाक्यात आणला. सूर्यकुमारने यादरम्यान आपले ८ वे अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस राहुलने विजयी षटकारासह अर्धशतक पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
IND vs SA 1st T20 HIGHLIGHTS: सुर्यकुमार आणि राहुलच्या अर्धशतकी खेळीने भारत विजयी

संबंधित बातम्या

IND vs NZ 2nd ODI: सामना न खेळताच संजू सॅमसनने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी संघावर केला खळबळजनक आरोप
IND vs NZ ODI Series: न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका तुम्हाला या चॅनलवर live पाहता येणार तेही अगदी निशुल्क
IND vs NZ 1st ODI: वॉशिंग्टन सुंदरने मॅट हेन्रीला झोपून लगावला अप्रतिम चौकार, पाहा व्हिडिओ
सर्वांना विस्मयचकित करत राहुल द्रविडने आईच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावली हजेरी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : भारतात लवकरच होणार ‘टिल्टिंग रेल्वे’चं आगमान, काय आहेत खास वैशिष्ट्ये?
लघवीतून येणाऱ्या दुर्गंधीचा ‘या’ ५ गंभीर आजारांशी असू शकतो संबंध; वेळीच ओळखा आणि हे उपाय करा
हिवाळ्यात जिममध्ये न जाता वजन कमी करण्यासाठी फाॅलो करा ‘या’ ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी
चीनमध्ये करोनाचा हाहाकार, कठोर निर्बंधाविरोधात नागरिक रस्त्यावर; ‘शी जिनपिंग’ यांना हटवण्याची मागणी
“घरात राहिलेला माणूस…” उद्धव ठाकरेंना रोग झाल्याचं म्हणत प्रसाद लाड यांची खोचक टीका!