IND vs SA ODI Match Timing Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये खेळवला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने १७ धावांनी शानदार विजय मिळवला. विराट कोहलीचं शतक, विराट-कोहलीची शतकी भागीदारी व कुलदीपच्या फिरकीची जादू यासह टीम इंडियाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा वनडे सामना कधी, कुठे, केव्हा खेळवला जाणार; जाणून घेऊया.

भारतीय संघ आता दुसऱ्या वनडे सामन्यात मालिका विजय मिळवण्याच्या हेतून उतरणार आहे. दुसरा वनडे सामना हा मालिकेतील निर्णायक सामना ठरणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिकेत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर वनडे मालिकेवर कब्जा करण्याचा टीम इंडियाचा मानस असेल. शुबमन गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाची धुरा सांभाळत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना बुधवार, ३ डिसेंबरला खेळवला जाईल. दुसरा वनडे सामना दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. तर १ वाजता नाणेफेक होईल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमाला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे मारक्रमने संघाचं नेतृत्त्व केलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात तेंबा बावुमा संघात परतू शकतो.

दुसरा वनडे सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. हे स्टेडियम त्याच्या उत्कृष्ट आउटफिल्ड आणि फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीसाठी ओळखलं जातं. या मैदानावर हाय-स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात. म्हणजेच रांचीमधील हाय-स्कोरिंग सामन्यानंतर रायपूरमधील दुसऱ्या वनडे सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टार या अॅपवर लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल]

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

तेंबा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रिट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, रुबिन हरमन, केशव महाराज, मार्को यान्सन, एडन मारक्रम, लुंगी एनगिडी, रायन रिकल्टन, प्रेनेलन सुब्रायन