Virat Kohli Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना रायपूरच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारताची रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गेल्या सामन्यात १३५ सामन्यात १३५ धावांची खेळी केल्यानंतर या सामन्यातही त्याने दमदार शतकी खेळी केली. लागोपाठ शतक झळकावून त्याने वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. दरम्यान या शतकी खेळीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

विराट कोहलीने रायपूर वनडे सामन्यात ९३ चेंडूत १०२ धावांची खेळी केली. या खेळीसह तो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेत सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. हे विराटचं भारत – दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेत सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी होते. दोघांनी ६ शतकं झळकावली होती. आता ७ वे शतक झळकावताच तो या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

विराटचे वनडे कारकिर्दीतील ५३ वे शतक

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने चांगली सुरुवात करून दिली होती. पण रोहित स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वालही माघारी परतला. सलामी जोडी माघारी परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीने मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून १९५ धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाडने १०५ धावांची खेळी केली. तर विराटने १०२ धावा केल्या.

या मालिकेत विराटच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी पोहोचला आहे. विराटने २ सामन्यामध्ये फलंदाजी करताना २३७ धावा केल्या आहेत. मालिकेतील शेवटच्या सामन्यातही तो मोठी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात असणार आहे.