IND vs SA 2nd Test Day 3 Live Updates in marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीचा आज तिसरा दिवस असून भारतीय संघ फलंदाजीला उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४८९ धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघ २०१ धावांवर सर्वबाद झाला असून द. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरत आहे आणि त्यांच्याकडे २८८ धावांची भक्कम आघाडी आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

भारत आणि दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसाअखेर ८ षटकांत द. आफ्रिकेने बिनबाद २६ धावा केल्या आहेत. यासह संघाची आघाडी ३१४ धावांवर पोहोचली आहे.

भारत गुवाहाटी कसोटीत सर्वबाद

भारतीय संघ गुवाहाटी कसोटीतील पहिल्या डावात ८३.५ षटकांत २०१ धावा करत सर्वबाद झाला. भारताकडून यशस्वी जैस्वालने ४८ धावा, वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावांची खेळी केली. तर कुलदीपने १३४ चेंडू खेळत १९ धावा केल्या आणि सुंदरला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा गाठला. भारत ऑलआऊट झाल्यानंतर आता दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासह द. आफ्रिकेकडे आता २८८ धावांची आघाडी आहे.

कुलदीप यादव झेलबाद

कुलदीप यादव व सुंदरची उत्कृष्ट भागीदारी तुटल्यानंतर कुलदीपही बाद होत माघारी परतला. कुलदीपने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चेंडूंच्या तुलनेत मोठी खेळी केली. कुलदीपने कमालीची डिफेन्स करत १३४ चेंडू खेळला ज्यामध्ये त्याने ३ चौकारांसह १९ धावा केल्या. सध्याच्या घडीला बुमराह व सिराजची जोडी मैदानावर आहे. भारताला आता फॉलोऑन टाळण्यासाठी ८९ धावांची गरज आहे.

वॉशिंग्टन-कुलदीपची भागीदारी

वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव यांची ७२ धावांची भागीदारी तुटली आहे. हार्मरने सुंदरला झेलबाद करत भारताला मोठा धक्का दिला. यासह भारताने ७९ षटकांत ८ बाद १९४ धावा केल्या आहेत.

लंच ब्रेक

भारतीय संघाने लंच ब्रेकपर्यंत ७ गडी बाद १७४ धावा केल्या आहेत. कुलदीप आणि वॉशिंग्टन सुंदरची जोडी मैदानावर आहे.

भारताच्या १५० धावा पूर्ण

भारतीय संघाने १५० धावांचा पल्ला गाठला आहे. मारक्रमच्या ५७व्या षटकात कुलदीपने चौकार लगावत भारताला १५० धावांचा पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदर व कुलदीपच्या जोडीने संघाचा डाव सावरत ८२ चेंडूत ३१ धावांची भागीदारी केली आहे.

टीम इंडियाला फॉलोऑनचा धोका

वाचा सविस्तर बातमी – IND vs SA: भारताला गुवाहाटी कसोटीत फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावा कराव्या लागणार? जाणून घ्या

रवींद्र जडेजा झेलबाद

मार्को यान्सनच्या बाऊन्सरवर रवींद्र जडेजा झेलबाद झाला. यान्सनने बाऊन्सर टाकला जो जडेजाच्या खांद्याला लागला, पण खांद्याला लागून तो बॅटला लागल्याने जडेजाला तिसऱ्या पंचांनी झेलबाद दिलं. यासह संघाने १२३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या. आता भारताला फॉलोऑनचा धोका आहे.

यान्सनची भेदक गोलंदाजी

मार्को यान्सनने ऋषभ पंतनंतर नितीश रेड्डी झेलबाद झाला आहे. मारक्रमने हवेत झेप घेत उत्कृष्ट झेल टिपला आणि यासह नितीश रेड्डी १० धावा करत बाद झाला. यासह भारताने १२० धावांवर सहावी विकेट गमावली.

ऋषभ पंत झेलबाद

टी ब्रेकनंतर दुसऱ्याच षटकात यान्सनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत झेलबाद झाला. यासह भारताने १०६ धावांवर ५ विकेट्स गमावल्या आहेत.

टीब्रेक

भारतीय संघाने पहिल्या सत्रात ४ विकेट्स गमावत १०२ धावा केल्या आहेत. यासह भारत ३८७ धावांनी सध्या मागे आहे. ऋषभ पंत व रवींद्र जडेजाची जोडी मैदानावर आहे.

साई सुदर्शन ध्रुव जुरेल स्वस्तात बाद

यशस्वीनंतर साई सुदर्शन ३५व्या षटकात हार्मरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर ३६व्या षटकात ध्रुव जुरेल खराब फटका खेळत झेलबाद झाला. यासह भारताला झटपट ४ धक्के बसले. यासह भारताने पहिल्या सत्रात ४ विकेट्स गमावले आहेत.

यशस्वी जैस्वाल झेलबाद

यशस्वी जैस्वालने अर्धशतक केल्यानंतर हार्मरच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. ५८ धावांवर बाद झाल्याने भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले.

यशस्वी जैस्वालचं अर्धशतक

यशस्वी जैस्वालने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटीत पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. यशस्वीने ८५ चेंडूत ६ चौकार व १ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. यासह भारताने आतापर्यंत १ बाद ८६ धावा केल्या आहेत.

भारताला पहिला धक्का

केशव महाराजने ६५ धावांची भागीदारी तोडत केएल राहुलला स्लिपमध्ये झेलबाद केलं आहे. २२व्या षटकात राहुल २२ धावांच्या स्कोअरवर झेलबाद झाला.

राहुल-यशस्वीची अर्धशतकी भागीदारी

केएल राहुल यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेरीस ९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी यापुढे खेळताना दोघांनीही अर्धशतकी भागीदारी रचली आहे. यासह टीम इंडियाने २० षटकांत बिनबाद ६३ धावा केल्या आहेत. यशस्वी अर्धशतकाच्या दिशेने जात आहे.

गुवाहाटी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाने दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. सेनुरन मुथुसॅमी २०६ चेंडूत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०९ धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. मुथुसॅमी व वेरेन यांनी ८८ धावांची भागीदारी केली. तर मुथुसॅमी व मार्को यान्सन यांनी ९७ धावांची भागीदारी रचली. यान्सनने ९१ चेंडूत ६ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची अफलातून खेळी केली. यासह दक्षिण आफ्रिका संघाने १५१ षटकांत ४८९ धावा केल्या. तर भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जडेजा, बुमराह, सिराज यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.