IND vs SA: भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी खरा ठरवला. फिरकीपटू कुलदीप यादवच्या फिरकी माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ढेपाळला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे, जिथे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी मैदान ओलसर असल्याने नाणेफेक उशिरा करण्यात आली. साधारण अर्धातास सामना उशिराने सुरु झाला. दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात जिंकणारा मालिका विजेता ठरणार आहे.मालिका जिंकण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल टाकले आहे. संघाच्या सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी खरा ठरवला. दक्षिण आफ्रिकेने आजच्या सामन्यात पुन्हा आपला कर्णधार बदलला. नाणेफेक करण्यासाठी डेव्हिड मिलर आला होता. गेल्या सामन्यातील कर्णधार केशव महाराज आजारी पडला असून आफ्रिकेने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराज व आवेश खान यांनी आज प्रभावी गोलंदाजी केली. सिराजने आफ्रिकेला दोन मोठे धक्के देताना यानेमन मलान ( १५) व रिझा हेंड्रीक्स (९) यांना माघारी पाठवले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या रवी बिश्नोईने सुरेख झेल टिपला. त्यानंतर शाहबाज अहमदने एडन मार्कराम (९) याला यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर वॉशिंग्टनने सामन्यातील दुसरी विकेट घेताना डेव्हिड मिलरला (७) त्रिफळाचीत केले. पुढील षटकात कुलदीप यादवने अँडिले फेहलुकवायोचा (५) त्रिफळा उडवला अन् आफ्रिकेची ६ बाद ७१ धावा अशी दयनीय अवस्था झाली.

दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत सापडला होता अशावेळी हेनरिच क्लासेन आफ्रिकेसाठी खिंड लढवत होता. त्याने ४२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या, त्याला शाहबाज अहमदने बाद केले. या सामन्यात कर्णधार असलेल्या डेव्हिड मिलरच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गडी बाद झाल्याने होती नव्हती ती शेवटची आशा देखील मावळली. त्याला केवळ ७ धावा करता आल्या वॉशिंग्टन सुंदरने त्रिफळाचीत केले. कुलदीप यादवने भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने अँडिले फेहलुकवायोला ८ धावांवर त्रिफळाचीत केले.टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू कुलदीपने सर्वाधिक चार गडी बाद केले. ही त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.