IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे, जिथे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सूर्य मावळण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे हा सामना वाहून जाणार नाही. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यालाही पावसाचा फटका बसला होता आणि त्यामुळे केवळ ४०-४० षटकांचा सामना होऊ शकला होता.

मालिकेतील तिसरा, निर्णायक एकदिवसीय सामना चुरशीचा होणार यात शंकाच नाही. मात्र ही लढत राजधानी दिल्लीत होत असून येथे पावसाचा जोर असल्याने प्रतिस्पर्धी संघ अन् क्रिकेटप्रेमी अशा साऱ्यांचाच विचका होण्याची शक्यता आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. कारण जो संघ या सामन्यात विजयी ठरेल त्यांना मालिका जिंकता येणार आहे. मालिकेतील १-१ अशी दोलायमान स्थिती, प्रतिस्पर्धी संघांचा सूर बघता आजचा सामना व्हावा अशीच दोन्ही संघांची इच्छा असावी. पण आफ्रिकेच्या दृष्टीने विचार केल्यास आगामी टी२० विश्वचषकाचा विचार करून कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असतील.

हेही वाचा :   IND vs SA 3rd ODI: धवन ब्रिगेड मालिका जिंकण्याच्या इराद्याने आज उतरणार मैदानात काय असेल प्लेईंग इलेव्हन, जाणून घ्या

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. कारण काल दिवसभर पावसाने संपूर्ण मैदान हे ओलसर झाले आहे. आजही दुपारी १२.३० वाजता खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाणेफेकीसाठी विलंब होऊ शकतो. जसे पहिल्या सामन्यात षटके कमी करून सामना खेळवण्यात आला होता त्याचप्रमाणे आताही तसाच प्रयत्न केला जाईल. या सामन्याकडे डोळे लावून बसलेले क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होऊ नये म्हणून मैदानातील सर्व कर्मचारी हे कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत.

हेही वाचा :  भारत-द.आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताचे मालिका विजयाचे ध्येय! ; आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना

खेळपट्टी आणि हवामान अंदाज

सामना होणार असेल तर खेळपट्टीत ओलसर राहील आणि त्यामुळे वेगवान गोलंदाजांना खूप मदत होईल. ढगाळ हवामान ही स्विंगसाठी उत्तम परिस्थिती असेल. मार्च २०१९ पासून अरुण जेटली स्टेडियमवर एकही एकदिवसीय सामना खेळला गेला नाही. मागील तीन सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २५९ आहे आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत. २६ सामन्यांत केवळ तीन वेळा कोणत्याही ३०० पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत.