India vs South Africa 4th T20I Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना आज लखनौमध्ये खेळवला जाणार होता, पण हा सामना आता रद्द कऱण्यात आला आहे. नाणेफेक न होताच खूप धुकं असल्याने दृश्यमानता सामन्यासाठी चांगली नसल्याने हा सामना रद्द केला गेला आहे. पंचांनी ९.२५ पर्यंत नाणेफेक होईल आणि सामना सुरू होईल यासाठी वाट पाहिली. पण हवामान पाहता सामना खेळवला जाणार नसल्याची माहिती दोन्ही संघांना देण्यात आली आहे. पाच षटकांचा सामना होण्यासाठी ९.४६ ही कट ऑफ वेळ होती. पण मैदानावरील धुकं सारखंच असल्याने अखेरीस पंचांनी ९.३० वाजता सामना रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.

Live Updates

IND vs SA Highlights : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना रद्द करण्यात आला. आता पाचवा टी-20 सामना शुक्रवारी होणार आहे.

 

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-२० सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

21:49 (IST) 17 Dec 2025

भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना रद्द झाल्याने भारतीय संघाला बसला मोठा फटका; काय आहे यामागचं कारण?

IND vs SA 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना रद्द करण्यात आला आहे. पण हा सामना रद्द झाल्याचा फटका मात्र भारतीय संघाला बसला आहे. ...अधिक वाचा
21:31 (IST) 17 Dec 2025
IND vs SA Live: चौथा टी-२० सामना रद्द

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लखनौमध्ये होणारा चौथा टी-२० सामना रद्द करण्यात आला आहे. लखनौमध्ये खूप धुकं असल्याने नाणेफेकीशिवाय सामना रद्द झाला आहे. सामन्यासाठी दृश्यमानता चांगली नसल्याने सामना खेळवण्यात आलेला नाही. चौथा टी-२० सामना न झाल्याने मालिका २-१ अशीच राहिल. त्यामुळे रविवारचा अखेरचा टी-२० सामना महत्त्वाचा असणार आहे. चौथा सामना रद्द झाल्यामुळे मालिका बरोबरीत देखील राहू शकते.

21:29 (IST) 17 Dec 2025
IND vs SA Live: मैदानाची पाहणी करण्यासाठी पंच मैदानावर

९.२५ वाजता पुन्हा पंच मैदानाची पाहणी करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. थोड्याच वेळात अपडेट समोर येईल.

21:19 (IST) 17 Dec 2025

IND vs SA Live: ५ षटकांचा सामना होण्याची कट ऑफ वेळ काय?

लखनौमधील धुक्यांमुळे अद्याप सामन्याची नाणेफेक झालेली नाही. पुन्हा एकदा ९.२५ ला मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान ५ षटकांचा सामना होण्यासाठी कट ऑफ वेळ ९.४६ आहे.

21:09 (IST) 17 Dec 2025

IND vs SA: हार्दिक पंड्याचा मैदानावर मास्क घातलेला VIDEO व्हायरल; लखनौमध्ये नेमकं काय झालं? हवेची गुणवत्तेची पातळी पाहाल तर…

Hardik Pandya Mask: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या लखनौमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून फिरताना दिसत आहे. ...सविस्तर वाचा
21:04 (IST) 17 Dec 2025

IND vs SA Live: पंचांनी दिली अपडेट

भारत आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-२० सामन्याच्या नाणेफेकीची वेळ अजूनही सांगण्यात आलेली नाही. ९ वाजता मैदानाची पाहणी केल्यानंतर ९.२५ वाजता मैदानाची पुन्हा एकदा पाहणी होणार आहे.

20:32 (IST) 17 Dec 2025
IND vs SA Live: मैदानाची पाहणी सुरू

पंच मैदानाची पाहणी करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील मैदानावर पाहणी करण्यासाठी उतरले होते. यानंतर पंच पुन्हा एकदा ९ वाजता मैदानाचं निरीक्षण करण्यासाठी उतरतील.

20:19 (IST) 17 Dec 2025
IND vs SA Live: कशी आहे लखनौमधील स्थिती

लखनौमध्ये अजूनही धुक्यांचं प्रमाण सारखंच आहे. मैदानावर लाईट असूनही समोरचा खेळाडूही नीट दिसत नाहीये, तर स्टँडही डोळ्यांना नीट दिसत नाहीत. चाहत्यांनी शेअर केलेले काही फोटो पाहूया.

https://twitter.com/BowledNsix/status/2001293414554357791

https://twitter.com/JatayuWrites/status/2001295084755587301

20:08 (IST) 17 Dec 2025

IND vs SA Live: सामना सुरू व्हायला विलंब

लखनौच्या मैदानावरील चौथ्या टी-२० सामन्याच्या नाणेफेकीला अजूनही विलंब होत आहे. पंचांनी ८ वाजता मैदानाची पाहणी केली, यानंतरही धुक्याचं प्रमाण तितकंच होतं. यामुळे पुन्हा एकदा ८.३० ला मैदानाची पाहणी पंच करतील.

19:54 (IST) 17 Dec 2025

IND vs SA: शुबमन गिल चौथ्या टी-२० सामन्यातून बाहेर; खराब फॉर्म की अजून काही? काय आहे कारण?

Shubman Gill: भारत आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-२० सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनबाबत अपडेट समोर आली आहे. शुबमन गिल चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. ...अधिक वाचा
19:32 (IST) 17 Dec 2025
IND vs SA: पंच मैदानावर

चौथ्या टी-२० सामन्यासाठी मैदानाची पाहणी करण्याकरता पंच मैदानावर उतरले आहेत. पंचांनी मैदानाची पाहणी केली, पण धुकं अजूनही तितकंच असल्याने पुन्हा एकदा अर्ध्या तासाने म्हणजेच ८ वाजता मैदानाची पाहणी केली जाईल.

19:23 (IST) 17 Dec 2025
IND vs SA Live: खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये

नाणेफेकीला लखनौमध्ये उशिरा झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ ड्रेसिंग रूममध्ये परतला आहे. तर काही वेळाने भारतीय संघातील काही खेळाडू सरावासाठी मैदानावर आहेत.

18:57 (IST) 17 Dec 2025

IND vs SA: नाणेफेक

लखनौमध्ये पंचांनी ६.५० ला पुन्हा मैदानाची पाहणी केली, यानंतरही नाणेफेकीची निश्चित वेळ सांगण्यात आलेली नाही. धुकं खूप असल्याने पुन्हा एकदा ७.३० वाजता पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर पुढील माहिती दिली.

18:33 (IST) 17 Dec 2025
IND vs SA: नाणेफेक उशिराने होणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-२० सामन्याची नाणेफेक उशिराने होणार असल्याती माहिती समोर आली आहे. चौथा टी-२० सामना लखनौमध्ये खेळवला जात आहे. लखनौमध्ये प्रचंड धुकं असल्याने सामन्याची नाणेफेक उशिराने होणार आहे. धुक्यांमुळे दृश्यमानता चांगली नसल्याने सामन्यालाही उशिरा सुरूवात होईल. ६.५० वाजता मैदानाचं निरीक्षण केलं जाईल.

17:55 (IST) 17 Dec 2025

India vs South Africa: बुमराह खेळणार का?

जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे तिसरा टी-२० सामना खेळू शकला नाही आणि शिवम दुबेने मंगळवारी सांगितलं की तो पुढील सामन्याकरता उपलब्ध आहे, परंतु त्याला १००% खात्री नव्हती.

17:23 (IST) 17 Dec 2025

वर्ल्ड नंबर वन! वरूण चक्रवर्तीचा टी-२० क्रमवारीत दबदबा, बुमराहला पण जे जमलं नाही ते करून दाखवलं...

Varun Chakravarthy: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरीसह वरूण चक्रवर्तीने आयसीसी क्रमवारीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ...वाचा सविस्तर
17:05 (IST) 17 Dec 2025

India vs South Africa: गिल आणि सूर्याच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा

टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघाकडे आता फक्त सात सामने शिल्लक आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल खराब फॉर्मशी झुंजत आहेत. लखनौमध्ये दोघांकडूनही चांगली कामगिरी पाहायला मिळावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

16:55 (IST) 17 Dec 2025
IND vs SA Live: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना आज १७ डिसेंबरला लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच ६.३० वाजता होईल.

India vs South Africa 4th T20I Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्याचे हायलाईट्स