IND vs SA 5th T20 Live Updates : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान सुरू असलेली पाच सामन्यांची टी २० मालिका रंगतदार स्थितीमध्ये आली होती. आज मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला.नाणेफेक जिंकून आफ्रिकेने भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, पावसाने सामन्यात दोनदा व्यत्यय आणल्याने निर्णायक सामना रद्द करण्यात आला. परिणामी पाच सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती.

Live Updates
20:08 (IST) 19 Jun 2022
बंगळुरूमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात

बंगळुरूमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून खेळ थांबवण्यात आला आहे. खेळपट्टी झाकून टाकण्यात आली आहे.

20:07 (IST) 19 Jun 2022
भारतीय कर्णधार मैदानात

सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने कर्णधार ऋषभ पंत मैदानात आला आहे. भारतीय चाहत्यांना कर्णधाराकडून भरपूर अपेक्षा आहेत.

20:05 (IST) 19 Jun 2022
भारताचा दुसरा सलामीवीर माघारी

बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या निर्णायक सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. भारताची अवस्था दोन बाद २७ अशी झाली आहे.

20:00 (IST) 19 Jun 2022
लुंगीने दिला भारताला पहिला धक्का

भारताचा सलामीवीर ईशान किशन १५ धावा करून बाद झाला. आफ्रिकेचा गोलंदाज लुंगी एनगिडीने त्याला त्रिफळाचित केले.

https://platform.twitter.com/widgets.js

19:53 (IST) 19 Jun 2022
पहिल्याच षटकात भारताच्या १६ धावा

सलामीवीर ईशान किशनने पहिल्या षटकात सलग दोन षटकार लावल्यामुळे भारताने १६ धावा जमवल्या.

19:51 (IST) 19 Jun 2022
पावसाचा व्यत्यय दूर झाल्याने खेळाला सुरुवात

बंगळुरूमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाचवा टी २० सामना सुरू झाला आहे. भारतीय सलामीवीर मैदानात उपस्थित आहेत.

19:30 (IST) 19 Jun 2022
७ वाजून ५० मिनिटांनी पडणार चेंडू

सामना सुरू होण्याच्या काही क्षण अगोदर बंगळुरूमध्ये जोरदार पावसाची सर आल्याने खेळ उशीरा सुरू केला जाणार आहे. दोन्ही संघाच्या डावातील एक-एक षटक कमी करण्यात आले आहे.

19:19 (IST) 19 Jun 2022
बंगळुरूमध्ये पाऊस थांबला

बंगळुरूमध्ये पाऊस थांबला असून मैदानावरील कव्हर्स बाजूला केले जात आहेत. त्यामुळे काहीवेळात खेळाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

19:01 (IST) 19 Jun 2022
बंगळुरूमध्ये पावसाला सुरुवात

मालिकेतील निर्णायक सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. बंगळुरूमध्ये पावसाला सुरुवात झाली असून मैदानात उतरलेले खेळाडू पुन्हा माघारी परतले आहेत.

18:59 (IST) 19 Jun 2022
भारतीय फलंदाज मैदानात

दक्षिण आफ्रिकेने दिलेले फलंदाजीचे निमंत्रण स्वीकारून भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला आहे. भारतीय सलामीवीर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले आहेत.

18:38 (IST) 19 Jun 2022
भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही

भारतीय संघ : ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.

दक्षिण अफ्रीकन संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेंड्रिक्स, रॉसी व्हॅन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, ट्रिस्टन स्टब्स, केशव महाराज(कर्णधार), एनरिक नॉर्किया, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

18:34 (IST) 19 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा जखमी

दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा जखमी असल्याने आज खेळू शकणार नाही. त्यामुळे निर्णायक सामन्यात केशव महाराज कर्णधारपदची जबाबदारी निभावणार आहे.

18:33 (IST) 19 Jun 2022
नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून यजमान भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js