IND vs SA: African captain Temba Bavuma's big statement about Indian team ahead of T20 series, know what he said...avw92 | Loksatta

IND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा याने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

IND vs SA: भारतीय संघाविषयी आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचे टी२० मालिकेआधी मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाला…
संग्रहित छायाचित्र (एक्सप्रेस)- कर्णधार टेंबा बावुमा

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत आहेत. या सामन्यात कुठल्या ११ खेळाडूंसह उतरायचं याचं आव्हान दोन्ही संघांसमोर आहे. तत्पूर्वी आफ्रिकी संघाचा कर्णधार टेंबा बावुमा याची खास प्रतिक्रिया समोर येत आहे. बावुमाच्या मते भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी मालिकेत आफ्रिकी संघासाठी घातक ठरू शकतो.

कर्णधार टेंबा बावुमाला असेही वाटते की, भारतीय खेळपट्टीवर नवीन चेंडूचा सामना करणे दक्षिण आफ्रिका संघासाठी सोपे नसेल. तो पुढे म्हणाला की, “नवीन चेंडूसह पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांचा सामना करणे सोपे नसेल. ते चेंडू स्विंग करू शकतात. हे फलंदाजीसाठी एक आव्हान आहे, ज्याचा सामना करण्यासाटी तुम्हाला स्वतःच्या फलंदाजीतील तंत्रज्ञान दाखवावे लागेल. संघाचे अधिक नुकसान न होता कमीत कमी गडी गमावणे, हे प्रमुख लक्ष्य असेल. असे असले तरी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह नेहमीच नवीन चेंडूने कडवे आव्हान देतात.”

हेही वाचा :  IND vs SA: विश्वचषकाआधी रोहित सेनेला संघातील समस्या सोडवण्याची अखेरची संधी, कशी असेल खेळपट्टी… 

दरम्यान, भुवनेश्वर कुमार या मालिकेत विश्रांतीवर असल्यामुळे आफ्रिकी संघाची चिंता काही प्रमाणात कमी होईल. भारतीय संघात सध्या जसप्रीत बुमराहसोबत उमेश यादव, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला गेला आहे. दक्षिण आफ्रिका हा असा संघ आहे ज्याने आतापर्यंत भारतात भारताविरुद्ध एकही टी२० मालिका गमावलेली नाही. आफ्रिका संघ जून महिन्यात भारतात आला होता. ही मालिका २-२ अशा बरोबरीत सुटली होती. यावेळी मात्र दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाला भारतात खेळण्याची भीती वाटत आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबतचे वक्तव्य केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
IND vs SA 1st T20: रोहित आणि विराटसाठी दाक्षिणात्य क्रिकेट चाहत्यांकडून विशेष सरप्राईज; मैदानाबाहेरील ही दृश्यं पाहिलीत का?

संबंधित बातम्या

‘तो’ झेल सुटला अन् भारताचा खेळ खल्लास, भर मैदानातच कर्णधार रोहित शर्मा भडकला, Video होतोय तुफान Viral
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी
IND vs BAN 1st ODI: थरारक सामन्यात बांगलादेशचा भारतावर एक गडी राखून विजय; केएल राहुलचे अर्धशतक व्यर्थ
IND vs BAN 1st ODI: बांगलादेशकडून टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव चाहत्यांकडून कठोर शब्दात टीका
IND vs BAN 1st ODI: शाकीब अल हसनचा झेल घेत विराट कोहलीने केली सव्याज परतफेड

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी