scorecardresearch

IND vs SA : अजिंक्य रहाणे संघाबाहेर असेल तर त्याच्या करिअरसाठी चांगले लक्षण नाही; माजी क्रिकेटपटूचे मत

अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

IND vs SA Ajinkya Rahane

दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादवचा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांने व्यक्त केले आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहलीचे संघात पुनरागमन केल्याने प्लेइंग इलेव्हनमधून हनुमा विहारी किंवा अजिंक्य रहाणेला बाहेर जाऊ लागू शकते असेही विनोद कांबळीने म्हटले आहे. रहाणे जर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला तर त्याच्या कसोटी कारकिर्दीसाठी ते चांगले ठरणार नाही, असे विनोद कांबळीचे मत आहे. रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले होते, याशिवाय त्याचा खराब फॉर्म देखील चिंतेचा विषय बनला आहे.

अजिंक्य रहाणेने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले असले आणि संघ व्यवस्थापनानेही त्याला सातत्याने पाठींबा दिला असल्याने त्याच्या जागी हनुमा संघाबाहेर असेल, असे मानले जात आहे. त्याचवेळी दुखापतग्रस्त सिराजच्या जागी इशांत शर्मा किंवा उमेश यादव यापैकी एकाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उमेश हा सिराजची सर्वोत्तम रिप्लेसमेंट असेल, असा विश्वास कांबळीला आहे.

IND vs SA : ऋषभ पंत तिसऱ्या कसोटीतून बाहेर?; साहाच्या पोस्टमुळे उडाली खळबळ

“मला वाटते तिसऱ्या कसोटी सामन्यात सिराजच्या जागी उमेश यादवला संधी मिळायला हवी. याशिवाय, विराट कोहलीच्या संघात पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळून रहाणे की हनुमा विहारी यापैकी कोणता खेळाडू आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रहाणेला संघातून वगळले तर ते त्याच्या कारकिर्दीसाठी चांगले लक्षण ठरणार नाही,” असे विनोद कांबळीने आपल्या सोशल मीडियावर म्हटले आहे.

भारत-आफ्रिका कसोटी मालिका : निर्णायक लढतीत कोहलीकडे लक्ष !

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या एका नवीन पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. साहाने ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात तो मंगळवारपासून केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी न्यूलँड्स स्टेडियममध्ये उभा दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये, ‘हॅलो केपटाऊन’ असे म्हटले आहे. या पोस्टमुळे साहाला तिसऱ्या कसोटीत ऋषभ पंतच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथे खेळला गेला, जो भारताने ११३ धावांनी जिंकला. त्यानंतर जोहान्सबर्ग येथे यजमानांनी सात गडी राखून विजय मिळवला. मालिकेतील तिसरी आणि निर्णायक कसोटी मंगळवारपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. भारताने केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकलेला नाही आणि दक्षिण आफ्रिकेत आजपर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2022 at 13:25 IST
ताज्या बातम्या