भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पार्ल येथे खेळला गेला. यामध्ये टीम इंडियाला ३१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २९७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ २६५ धावा करू शकला. भारतीय डावात ऋषभ पंत १६ धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने त्याला चपळतेने यष्टीचीत केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ४ गडी गमावून २९६ धावा केल्या. यानंतर टीम इंडिया फलंदाजीला आली. यादरम्यान पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. फेहलुकवायोच्या एका चेंडूवर शॉट खेळण्यासाठी तो क्रीजच्या बाहेर आला. हे पाहताच डी कॉकने संधीचा फायदा घेत अप्रतिमरित्या आणि वेगाने यष्टीचीत केले.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Crime Branch raid on Betting on IPL Cricket Match in Kothrud
कोथरुडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; गुन्हे शाखेचा छापा, दहा सट्टेबाज अटकेत
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

हेही वाचा – भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताचा पराभव ; मधल्या फळीच्या हाराकिरीमुळे पहिल्या लढतीत निराशा

शिखर धवनने टीम इंडियासाठी ७९ धावांची शानदार इनिंग खेळली. तर माजी कर्णधार विराट कोहलीने ५१ धावा केल्या. शेवटी शार्दुल ठाकूरने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूत ५० धावा केल्या. ठाकूरनेही ५ चौकार आणि १ षटकार लगावला. मात्र, तो भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.