भारतीय क्रिकेट संघ १२ डिसेंबरला म्हणजेच आज संध्याकाळी मुंबईत जमणार आहे, तेथून पुढील ३ दिवस ते हॉटेलमध्ये क्वारंटाइन असतील. यानंतर १६ डिसेंबरला सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. तिथेही टीम इंडिया सुरुवातीला क्वारंटाइनमध्ये असेल आणि फक्त बायो-बबलमध्ये सराव करेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार आणि कसोटी संघाचा उपकर्णधार बनवल्यानंतर तो आज प्रथमच विराट कोहलीला भेटणार आहे. कोहली भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करत राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकला आलेली नाही. प्रशिक्षक राहुल द्रविडसाठीही हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून तर शेवटची कसोटी ११ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. या दौऱ्यावर कोहली १०० कसोटी खेळण्याचा विक्रम गाठू शकतो. त्याने आतापर्यंत ९७ कसोटीत २७ शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – काय सांगता..! रोहितला मिळणार अजून एक कर्णधारपद? पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटपटूचा ‘बडा’ दावा!

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत नुकतेच न्यूझीलंडचा पराभव केला. विराट मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात संघाशी जोडला गेला, ज्यामध्ये भारताने धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय नोंदवला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ३७२ धावांनी नमवले. यासह भारताने कसोटी मालिकाही १-० अशी जिंकली.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत यादव. शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

स्टँड बॉय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागासवाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa team india to assemble in mumbai on sunday before departing for johannesburg adn
First published on: 12-12-2021 at 09:05 IST