scorecardresearch

VIDEO : कॅप्टन्सी सोडली, पण अंदाज तोच..! आफ्रिकेच्या कर्णधाराशी मैदानातच भिडला विराट; पाहा नक्की झालं काय

गेल्या आठवड्यात विराटनं कसोटीचं कर्णधारपद सोडलं. आता तो संघात फक्त फलंदाज भूमिका बजावणार आहे.

ind vs sa virat kohli and temba bavuma engaged in heated exchange
विराट कोहली आणि टेंबा बावुमाची बाचाबाची

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या होत्या. गेल्या आठवड्यातही कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीचा हा पहिलाच सामना होता. कोहलीने शानदार फलंदाजी करताना ५१ धावा केल्या, मात्र पुन्हा एकदा शतक झळकावण्यात अपयश आले. भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

या सामन्यादरम्यान कोहलीची आक्रमक शैली पुन्हा पाहायला मिळाली, ज्यामुळे त्याला त्याच्या कर्णधारपदाच्या काळातील आठवण झाली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान कोहली आणि आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा यांच्यात बाचाबाची झाली. लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहलने टाकलेल्या ३६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाने चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळला, जिथे विराटने तो अडवला आणि बावुमाच्या दिशेने फेकला.

हेही वाचा – VIDEO : …अन् काही क्षणात आफ्रिकेच्या विकेटकीपरनं ऋषभ पंतला धाडलं माघारी; पाहा अफलातून STUMPING!

विराटचा थ्रो बावुमाजवळून गेला आणि तो बचावला. यानंतर बावुमा विराटला काहीतरी बोलताना दिसला. कोहलीही कुठे मागे राहणार होता आणि त्यानेही आफ्रिकन कर्णधाराला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sa virat kohli and temba bavuma engaged in heated exchange adn

ताज्या बातम्या