Yuzvendra Chahal Cicks Tabraiz Shami: भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल त्याच्या दिलखुलास खेळीसाठी प्रसिद्ध आहे. तो अनेकदा मैदानावर आणि मैदानाबाहेर मजा मस्ती करताना दिसला आहे. भारत दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान देखील अशीच एक घटना घडली. या सामन्याच्या मध्यावर युझवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर गोलंदाज तबरेझ शम्सीला लाथ मारताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान ही घटना घडली. फ्लडलाइट्सच्या समस्येमुळे सामना काही काळासाठी रद्द करण्यात आला होता. दरम्यान, युझवेंद्र चहल कॅमेऱ्यात कैद झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम आणि तबरेझ शम्सी उभे असल्याचे दिसत आहे, तेव्हा युजवेंद्र चहलही त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि तबरेज शम्सीला गुडघ्याने लाथ मारतो. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.

( हे ही वाचा: Video: कारचा दरवाजा अचानक उघडणे पडले महागात; दुचाकीस्वार थेट घुसला ट्रकमध्ये, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ)

पाहा व्हायरल व्हिडिओ

या मालिकेत आतापर्यंत युझवेंद्र चहलला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची संधी मिळालेली नाही . त्याच्या जागी अनुभवी स्पिनर रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. अश्विनने पहिल्या सामन्यात चार षटकात फक्त ८ धावा दिल्या होत्या.

( हे ही वाचा: Video: गुजरातमध्ये चाहत्यांसोबत गरबा खेळताना दिसला नीरज चोप्रा; गोल्डन बॉयचा व्हिडिओ झाला व्हायरल)

या सामन्याबद्दल बोलायचं तर, सूर्यकुमार यादव (२२ चेंडूंत ६१ धावा) आणि केएल राहुलच्या (२८ चेंडूंत ५७) फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी मात केली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २३७ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ३ बाद २२१ धावांवर मर्यादित राहिला. डेव्हिड मिलर (४७ चेंडूंत नाबाद १०६) आणि क्विंटन डीकॉक (४८ चेंडूंत नाबाद ६९) यांचे प्रयत्न अपयशी ठरले.