“…म्हणून मी ODI कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला”; ईशान किशनने सांगितलं ‘रिटर्न गिफ्ट’ कनेक्शन

याच वर्षी सुर्यकुमार यादवनेही आपल्या टी-२० च्या पदार्पणाच्या सामन्यात षटकार लगावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता.

IND vs SL 1st ODI Ishan Kishan
या पूर्वी सूर्यकुमार यादवने टी-२० मध्ये असा पराक्रम केलेला. (फोटो ट्विटरवरुन साभार)

भारतीय क्रिकेट संघातील विकेटकीपर बॅट्समन असणाऱ्या ईशान किशनने श्रीलंकेविरुद्धच्या आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये तुफान खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ईशानने अर्धशतक झळकावले. ४२ चेंडूंमध्ये ५९ धावा ईशानने केल्या. यामध्ये त्याने आठ चौकार आणि दोष षटकार लगावले. तसेच या खेळीमध्ये त्याने एक विशेष विक्रमही आपल्या नावावर केला. टी-२० बरोबरच एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्याच सामन्यात ५० हून अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू ठरलाय.

ईशान सहाव्या षटकामध्ये फलंदाजीला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करताना त्याला पहिलाच चेंडू श्रीलंकेच्या धनंजया डी सिल्वाने टाकला. या पहिल्याच चेंडूवर ईशानने षटकार लगालवा. या सामन्यानंतर ईशानने पहिल्याच चेंडूमध्ये षटकार का लगावला यामागील किस्सा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना अजय जडेजाला सांगितला.

ईशानने आपण पहिल्याच चेंडूवर षटकार लगावणार हे ठरवून मैदानात पाऊल ठेवल्याचं सांगितलं. ड्रेसिंग रुममधील सर्वच खेळाडूंना याबद्दल ठाऊक होतं. “मी आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की मी जेव्हा फलंदाजीला जाईल तेव्हा गोलंदाज कोणताही असला आणि त्याने कसाही चेंडू टाकला तरी मी षटकार लगावणार. खरोखरच तसं घडलं. आज माझा दिवस होता आणि गोष्टी माझ्या डेब्यू मॅचमध्ये माझ्या इच्छेप्रमाणेच घडल्याचा आनंद आहे,” असं ईशान म्हणाला. फलंदाजी करताना आपण श्रीलंकन गोलंदाजांविरोधात आक्रामक खेळी करु शकतो असं वाटल्याने छान खेळ करता आल्याचंही इशान म्हणाला.

पुढे बोलताना ईशानने, माझा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी मी माझा पहिला एकदिवसीय सामना खेळत होतो. प्रत्येकजण रिटर्न गिफ्ट मागतो. त्यामुळे मी चांगला खेळ करुन संघाला विजय मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याच्या दृष्टीने खेळ करत हे रिटर्न गिफ्ट दिलं, असंही ईशान म्हणाला.

ईशानने आपल्या खेळीदरम्यान प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. अनेकदा त्याला जीवनदान मिळालं. दोनदा त्याचा झेलही श्रीलंकन खेळाडूंनी सोडला. त्यानंतर कर्णधार धवनने त्याला आरामात खेळण्याचा सल्ला दिला. मात्र ईशानने मैदानात येतानाच आक्रमक खेळ करण्याचं ठरवलं होतं. मी धवनला मला जास्तीत जास्त स्ट्राइक दे असं सांगितल्याचंही, ईशान म्हणाला. मी जर मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी ठरत होतो तर त्याच गतीने खेळावं असा माझा विचार होता, असंही ईशान म्हणाला. ईशान ५९ धावा करुन बाद झाला.

याच वर्षी सुर्यकुमार यादवनेही आपल्या टी-२० च्या पदार्पणाच्या सामन्यात षटकार लगावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs sl 1st odi ishan kishan revels the reason of hitting six on first ball to start his odi career scsg

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या