scorecardresearch

IND vs SL 1st T20: भारताला विजय मिळवून देण्यासाठी दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात सज्ज

IND vs SL 1st T20 Match Updates: भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

IND vs SL 1st T20: भारताला विजय मिळवून देण्यासाठी दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात सज्ज
कर्णधार हार्दिक पांड्याला दुखापत (फोटो-ट्विटर)

भारत आणि श्रीलंका संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी ५ बाद १६२ धावा केल्या. त्याचबरोबर श्रीलंका संघासमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यातून भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली.

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. भानुका राजपक्षेचा झेल घेताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्याने झेल घेतला, परंतु या दरम्यान त्याचा स्नायू दुखावला गेला. भानुकाने १० धावा केल्या. त्यानंतरही अतिंम टप्प्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या भारताला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात सज्ज झाला.

श्रीलंकेचा १०० धावांचा टप्पा पूर्ण –

१६३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात खराब झाली होती. असे असले तरी श्रीलंकेने १४ व्या षटकात १०० धावा पूर्ण केल्या. युझवेंद्र चहलच्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर वानिंदू हसरंगाने सलग दोन षटकार ठोकून श्रीलंकेची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. श्रीलंकेने १४ षटकात ५ विकेट गमावत १०७ धावा केल्या.

हेही वाचा- IND vs SL 1st T20: शिवम मावीचे शानदार पदार्पण; पहिल्याच सामन्यात दोघांना दाखवला तंबूचा रस्ता

शिवम मावीचे तिसरे यश –

युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने वानिंदू हसरंगाला हार्दिक पांड्याकडे झेलबाद करून श्रीलंकेला सहावा धक्का दिला. हसरंगा २० चेंडूत २१ धावा करून बाद झाला. आता चमिका करुणारत्ने कर्णधार दासून शनाकाला साथ देण्यासाठी आला आहे. श्रीलंकेने १५ षटकांत ६ बाद १०६ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 22:31 IST

संबंधित बातम्या