IND vs SL 1st T20I Highlights :भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात दणदणीत विजयाने केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पल्लेकेले स्टेडियमवर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात यजमान संघ १९.२ षटकांत १७० धावांत ऑल आऊट झाला. भारताकडून रियान परागने १.२ षटकांत ५ धावा देत ३ विकेट घेतले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हेही वाचा - Paris Olympics 2024: ऑलिम्पिक नगरीत ३ लाखांहून अधिक कॉन्डोमचं वाटप, काय आहे यामागचं कारण भारताने दिलेल्या २१४ धावांच्या मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना श्रीलंकेने दणक्यात सुरूवात केली. पथुम निसांका (४८ चेंडूत ७९ धावा) आणि कुसल मेंडिस (२७ चेंडूत ४५ धावा) यांच्यात पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. १५व्या षटकात श्रीलंकेने तीन गडी गमावून १४९ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर फलंदाजी बाजू कोलमडली आणि त्यांनी झटपट विकेट गमावल्या. श्रीलंकेच्या शेवटच्या नऊ विकेट ३० धावा करण्यात गमावल्या होत्या. अक्षर पटेलने निसंका आणि कुसल परेराची एकाच षटकात विकेट मिळवत सामना भारताच्या बाजूने वळवला. भारताकडून अर्शदीप, अक्षरने २ तर रियान परागने ३ विकेट घेतल्या. सोबतच सिराज आणि बिश्नोईने प्रत्येकी १ विकेट मिळवली. हेही वाचा - IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका मालिकेचे सामने लाइव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या योग्य चॅनेल व मोबाईल अॅप नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४० धावा) आणि शुभमन गिल (३४ धावा) यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारून दिली. सूर्यकुमार (२६ चेंडू, आठ चौकार, दोन षटकार) आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (४९ धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. भारताचा टी-२० कर्णधारपद कायमस्वरूपी बनवल्यानंतर, सूर्यकुमारने आपल्या पहिल्या सामन्यात २६ चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यादरम्यान त्याने आपले २०वे अर्धशतक झळकावले. वानिंदू हसरंगाने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्याच्या गुगलीवर जैस्वाल स्टपिंग होत झेलबाद झाला. दोघांनाही एकाच धावसंख्येवर बाद करून श्रीलंकेने भारताला दुहेरी झटका दिला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋषभ पंतने संथ सुरूवात केली पण नंतर तुफान फटकेबाजी करत अर्धशतकाच्या जवळ आला. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने चार तर मधुशंका, असिथा फर्नांडो आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.