scorecardresearch

IND vs SL 1st T20: चहलकडे इतिहास रचण्याची मोठी संधी; भुवनेश्वर कुमारचा ‘हा’ विक्रम मोडू शकतो

IND vs SL 1st T20 Match Updates: भारत आणि श्रीलंका संघात पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने १० षटकांच्या समाप्तीनंतर ३ बाद ७५ धावा केल्या आहेत.

IND vs SL 1st T20: चहलकडे इतिहास रचण्याची मोठी संधी; भुवनेश्वर कुमारचा ‘हा’ विक्रम मोडू शकतो
युझवेंद्र चहल (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

IND vs SL 1st T20 Match Updates: भारत आणि श्रीलंका संघांत तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

युझवेंद्र चहलकडे या मालिकेत भारतासाठी टी-२०मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याची मोठी संधी आहे.सध्या भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या नावावर भारतासाठी टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्याने ८७ सामन्यात ९० विकेट घेतल्या आहेत. आणि युजवेंद्र चहलने ७१ सामन्यात ८७ विकेट घेतल्या आहेत.

अशा स्थितीत युझवेंद्र चहलकडे भुवनेश्वर कुमारला मागे टाकण्याची मोठी संधी आहे.श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने ४ विकेट घेतल्यास तो टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल. त्याने ३ विकेट घेतल्यास तो भुवनेश्वर कुमारच्या बरोबर येईल.

विशेष म्हणजे आशियाई देशांसोबत खेळताना चहलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १० सामन्यात एकूण २० विकेट घेतल्या आहेत. चहलने शेवटचा टी-२० सामना नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये तो शेवटच्या टी-२० मध्ये चांगलाच महागडा ठरला होता. त्याने ३ षटकात ११.६६च्या इकॉनॉमी रेटने ३५ धावा दिल्या होत्या.

हेही वाचा – NZ vs PAK: लाइव्ह मॅचमध्ये डान्स करताना दिसला बाबर आझम; व्हिडिओ होतोय व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांच्या समाप्तीनंतर ३ बाद ७५ धावा केल्या आहेत. सध्या इशान किशन ३६ आणि कर्णधार हार्दिक पांड्या १७ धावांवर खेळत आहेत. तसेच शुबमन गिल आणि सूर्यकुमार प्रत्येकी ७ धावा करुन बाद झाले आहेत. त्याचबरोबर संजू सॅमसन देखील स्वस्तात परतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 20:13 IST

संबंधित बातम्या