India vs Srilanka 1st Test: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांदरम्यान सुरु असलेला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील आतापर्यंत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या १९३ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत श्रीलंकेने ४ गडी बाद ८४ धावा केल्या आहेत.

टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर! विजयासाठी अवघ्या इतक्या विकेट्सची गरज

भारतीय संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी अवघ्या ६ विकेट्सची गरज आहे. तर श्रीलंकेला अजूनही २८८ धावा करायच्या आहेत.

टीम इंडियाची दमदार सुरुवात! श्रीलंकेचे टॉप २ फलंदाज तंबूत

टीम इंडियाने धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला लागोपाठ २ मोठे धक्के दिले आहेत.

भारताचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपला! श्रीलंकेला विजयासाठी इतक्या धावांची गरज

भारतीय संघाचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपला आहे. यासह भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

टीम इंडियाला सातवा धक्का! रवींद्र जडेजा परतला माघारी; आघाडी ३५० पार

भारतीय संघाला सातवा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजा ९ धावा करुन माघारी परतला आहे.

षटकारांचा बादशहा! १०० षटकारांसह ऋषभ पंतच्या नावे खास रेकॉर्ड

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहेत. या षटकारासह त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने ८९ डावात १०० षटकार खेचले आहेत. यासह सर्वात जलद १०० षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.

भारताचा निम्मा संघ तंबूत! ध्रुव जुरेल अवघ्या इतक्या धावा करत परतला माघारी

ध्रुव जुरेल अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला आहे.

देवदत्त पडिक्कलचं अर्धशतक थोडक्यात हुकलं! इतक्या धावा करुन माघारी परतला

या सामन्यातही देवदत्त पडिक्कलकडे मोठी खेळी करण्याची संधी होती. पण तो ४४ धावांवर माघारी परतला आहे.

गिल पुन्हा एकदा फ्लॉप! दुसऱ्या डावात अवघ्या इतक्या धावांवर परतला माघारी

पहिल्या डावात फ्लॉप ठरल्यानंतर दुसऱ्या डावातही गिलचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या डावात तो अवघ्या ८ धावांवर माघारी परतला आहे.

पहिल्यांदा थोडक्यात बचावला, पण आता विकेट गेलाच; केएल राहुल अवघ्या इतक्या धावा करत परतला माघारी

भारतीय संघाला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. केए राहुल ३५ धावा करुन माघारी परतला आहे.

यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद

दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. यशस्वी जैस्वाल शून्यावर माघारी परतला आहे.