Rishabh Pant Sixes Record: भारताचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सामन्यातील पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कल शतकी खेळी करुन नाबाद परतला. तर ऋषभ पंत २७ धावांवर नाबाद परतला. यादरम्यान पंतने ६८ व्या षटकात फलंदाजी करताना खणखणीत षटकार खेचला.या षटकाराह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅडम गिलख्रिस्टचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्येही मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने काही मोठे फटके मारले. तर झाले असे की, श्रीलंकेकडून ६८ वे षटक टाकण्यासाठी प्रभात जयसूर्या गोलंदाजीला आला. यादरम्यान पंतने लाँग ऑनच्या वरुन खणखणीत षटकार खेचला. हा पंतने परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना मारलेला ५७ षटकार ठरला. यासह ऋषभ पंत हा परदेशात फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
पंतने मोडला गिलख्रिस्टचा रेकॉर्ड
या षटकारासह पंतने गिलख्रिस्टचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. गिलख्रिस्टने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाबाहेर फलंदाजी करताना ५६ षटकार खेचले होते. त्याने १९९९ ते २००८ या ९ वर्षांत परदेशात कसोटी क्रिकेट खेळताना ५६ षटकार खेचले होते. आता पंत गिलख्रिस्टला मागे टाकून पुढे गेला आहे. तर पंतच्या नावे आता ५७ षटकार खेचण्याची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याच्या रेकॉर्ड हा बेन स्टोक्सच्या नावावर आहे. स्टोक्सने ६९ षटकार खेचले आहेत. तर स्टोक्सच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याची देखील नोंद आहे. स्टोक्सने एकूण १३८ षटकार खेचले आहेत. तर ब्रँडन मु्क्कुलमच्या नावे १०७ षटकार खेचले आहेत. गिलख्रिस्टच्या नावे १०० षटकार मारण्याची नोंद आहे. तर ऋषभ पंतच्या नावे ९८ षटकार खेचण्याची नोंद आहे.
