पहिल्या एकदिवसीय सामन्यात युजवेन्द्र चहलला दुखापत झाल्याने श्रीलंकेविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने त्याच्या ऐवजी कुलदीप यादवला अंतिम अकरा मध्ये स्थान दिले. या संधीचे सोने करत कुलदीपने तीन गडी बाद करत श्रीलंकेला सर्वबाद करण्यात मोलाची साथ दिली. कुलदीपने कर्णधाराचा विश्वास कायम राखत मागील सामन्यात नाबाद शतकी खेळी करणारा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला खेळपट्टीवर अधिक काळ टिकण्याआधीच त्याला माघारी पाठवले. ही कामगिरी करताना त्याने अनेक विक्रम मोडीत काढले.

गुवाहाटीच्या एकदिवसीय सामन्यात शनाकाने नाबाद १०८ धावा केल्या होत्या, तो कोलकाताच्या सामन्यात २ धावा करत बाद झाला. कुलदीपच्या २३व्या षटकाच्या पाचवा चेंडूवर शनाकाला पुढे येत नीट शॉट मारता आलाच नाही आणि तो चेंडू पॅडला लागून लेग स्टम्पला लागला. शनाका बाद झाला आणि श्रीलंकेचा संघ अडचणीत आला. तो बाद झाल्यानंतर संघाची स्थिती ५ बाद १२६ अशी झाली होती. कुलदीपने या सामन्यात श्रीलंकेच्या कुशल मेंडिस आणि चरिथ असालंका यांनाही बाद केले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने महत्वाच्या विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव संथ केला. त्याने १० षटकात ५१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

कुलदीपने यासह विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपने एकापाठोपाठ तीन विकेट घेत बळींचे द्विशतक पूर्ण केले. कुलदीपने आजच्या या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून २०० बळी पूर्ण केले. हा पराक्रम करण्यासाठी कुलदीपला १०७ सामने आणि ११० डाव खेळावे लागले आणि या टप्प्यापर्यंत पोहोचणारा तो भारताचा २३वा गोलंदाज ठरला. कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७२ सामने खेळत सर्वाधिक १२२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये दोन हॅट्ट्रिकचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: Hardik Pandya Abuse: “पानी मांगा था…”, हार्दिक पांड्याची घसरली जीभ, पाणी न दिल्याने डगआऊटमधील खेळाडूंना वापरले अपशब्द

त्याचबरोबर कुलदीपला जेव्हाही कसोटी आणि टी२० मध्ये संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचे सोने करत गडी बाद केले आहेत. कुलदीपच्या नावावर कसोटीतील १४ डावांत ३४ तर टी२० च्या २४ डावांत ४४ बळी आहेत. कुलदीपने २५ मार्च २०१७ रोजी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच वर्षी, पुढील काही महिन्यांत, त्याने एकदिवसीय आणि टी२० मध्ये पदार्पण केले होते. त्याला २०० बळींपर्यंत पोहोच्नायासाठी ५ वर्षांचा वेळ लागला.