लखनऊ येथे झालेला श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना भारताने ६२ धावांनी जिंकला. आता भारतीय संघ हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे होणारा दुसरा सामना जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ मालिकेवर कब्जा करेल. दुसरीकडे, श्रीलंका संघासाठी हा करा किंवा मरो असा सामना असेल. क्षेत्ररक्षण वगळता भारतीय संघ प्रत्येक विभागात मजबूत दिसत आहे.

श्रीलंकेच्या संघासाठी अव्वल फळीतील फलंदाजी अडचणीची ठरली आहे. गेल्या सामन्यातही त्यांच्या विकेट लवकर पडल्याचे दिसून आले. या सामन्यात त्यांच्या फलंदाजांना धावा जमवाव्या लागतील. शिवाय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करावी लागेल. मुख्य फिरकीपटू हसरंगाची उणीवही श्रीलंकेला भासली. इशान किशनचे फॉर्ममध्ये परत येणे टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. या सामन्यातही त्याच्याकडून धावा होण्याची अपेक्षा आहे.

UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
loksatta analysis causes of rising inflation
विश्लेषण : महागाईविरोधी युद्धात ‘नव्या शत्रूं’चा समावेश?
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल

हेही वाचा – जोकोविचला मागे टाकत रशियाचा डॅनिल मेदवेदेव बनणार नंबर १ टेनिसपटू; युक्रेनविरुद्धच्या युद्धाबाबत म्हणतो…

श्रीलंका – दासुन शनाका (कर्णधार), दिनेश चंडीमल, कुसल मेंडिस, पथुम निसांका, दनुष्का गुणतिलाका, चरिथ अस्लंका, चमिका करुणारत्ने, दुस्मंथा चमिरा, महिष टीक्षाना, जेफ्री वेंडरसे, लाहिरू कुमारा

खेळपट्टी आणि हवामानाविषयी माहिती

धर्मशाला मैदानात सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळू शकते. पुढे खेळणाऱ्या संघासाठी दव महत्त्वाची भूमिका बजावेल. अशा स्थितीत फलंदाजी करणे सोपे होऊ शकते. प्रथम फलंदाजी करताना किमान १८० धावा कराव्या लागतील. हवामान स्वच्छ राहील आणि पावसाची शक्यता नाही.
शनिवारी भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. याशिवाय हॉटस्टार अॅप्लिकेशनवरही हा सामना पाहता येणार आहे.