भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने नाबाद १६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीच्या बॅटमधून ८ षटकार आणि १३ चौकार बाहेर पडले. विराटचे गेल्या चार सामन्यांमधील हे तिसरे शतक आहे. या दरम्यान विराट कोहलीच्या बॅटमधून एक पुल शॉटही पाहायला मिळाला. जो पाहून रोहितवे टाळ्या वाजवून विराटचे स्वागत केले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने ५० व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पुल शॉट खेळताना खणखणीत षटकार लगावला. विराट कोहलीच्या बॅटमधून बाहेर पडलेला हा षटकार पाहून रोहित शर्माने त्याचे अभिनंदन केले. रोहित शर्माने दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवून किंग कोहलीचे स्वागत केले. खरं तर, रोहित शर्मा अशा प्रकारचे शानदार पुल शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो. भारतीय संघाचा स्टार फलंदाजी विराट कोहली त्याच्या जुन्या अवतारात परतला आहे.

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

या सामन्यात रोहित शर्माने ४९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. रोहितने या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. रोहित त्याच्या आवडत्या शॉटवर स्क्वेअर लेगला झेल बाद झाला.

सामन्याबद्दल, बोलायचे तर या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३९० धावा केल्या होत्या. ज्यामुळे श्रीलंका संघाला ३९१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव २२ षटकांत ७३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने ३१७ मोठी विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका ३-० ने आपल्या नावावर केली.

हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: फक्त धावांचाच नव्हे तर विराटचा आणखी एक विक्रम; पोलार्ड, लाराला मागे टाकत सेहवागशी केली बरोबरी

भारतीय संघाकडून गोलंदाजी मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने १० षटकांत केवळ ३२ धावा दिल्या. त्याचबरोबर मोहम्मद शम्मी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.