scorecardresearch

IND vs SL 3rd ODI: इशान-सुर्याला न मिळणाऱ्या संधीबाबत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने मौन सोडले, म्हणाले “इतरांची कामगिरी…”

Vikram Rathod on Ishan-Surya: टी२० आंतरराष्ट्रीय मध्ये प्रभावी कामगिरी करूनही, श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली नाही.

IND vs SL 3rd ODI: इशान-सुर्याला न मिळणाऱ्या संधीबाबत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने मौन सोडले, म्हणाले “इतरांची कामगिरी…”
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

Vikram Rathod on Ishan-Surya: भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी शनिवारी सांगितले की, फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना समजले आहे की त्यांना वनडेमध्ये इतक्या लवकर संधी मिळणार नाही त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागेल. अलिकडच्या वर्षांत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांची चमकदार कामगिरी असूनही, दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही, यामुळे क्रीडा चाहते आणि काही माजी खेळाडूंना आश्चर्य वाटले.

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी शनिवारी सांगितले की, “फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना वनडे फॉरमॅटमध्ये त्यांची पाळी येण्याची वाट पाहावी लागेल.” अलिकडच्या वर्षांत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांची प्रभावी कामगिरी असूनही, श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला नाही, यामुळे क्रीडा चाहते आणि काही माजी खेळाडूंना आश्चर्य वाटले.

हेही वाचा: Gautam Gambhir: “जो गंभीर को हसा दे…” मोहम्मद कैफने शेअर केलेला भारतीय स्टारचा हसणारा फोटो ठरला इंटरनेट सेन्सेशन, तुम्ही पाहिलात का?

फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले, “त्यांना बाहेर बसण्यास भाग पाडले गेले नाही, म्हणजे इतर खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. एक खेळाडू म्हणून, त्याला हे देखील समजते आणि त्याला त्याच्या संधीची वाट पाहावी लागते आणि तो त्यासाठी तयारी देखील करतो, तो कठोर परिश्रम करतो आणि जेव्हा जेव्हा संधी येते तेव्हा तो चांगली कामगिरी करतो आणि त्याच्या भूमिकेवर उभा राहतो.” पुढे ते म्हणाले, “ त्या दोघांना जबरदस्तीने बाकावर नाही बसवले. माझे म्हणणे आहे की, बाकी खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे सगळ्यांना माहित आहे त्यांना प्रतिक्षा ही करावीच लागेल. ते दोघे चांगला सराव करतात आणि जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते अप्रतिम कामगिरी करतात”, असे विक्रम राठोड म्हणाले.

राठोड यांनी सूर्यकुमारचे स्पष्टीकरत देताना म्हटले, “सूर्यकुमार एक चांगला फलंदाज आहे. तो सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. जेव्हा-जेव्हा त्याला संधी दिली जाते तेव्हा-तेव्हा तो संघासाठी महत्वाची भुमिका बजावतो. यामुळे वेळ येईल तेव्हा त्याला संधी दिली जाईल. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे महत्वाचे आहे.” इशान मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो वर राठोड म्हणाले, “सध्यातरी त्याला सलामीवीर म्हणून घेतले आहे, मात्र ईशानसारख्या फलंदाजाची आवश्यकता असली तर नक्कीच आम्ही त्या खेळाडूला मधल्या फळीत फलंदाजीला पाठवू.”

हेही वाचा: भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; श्रीलंकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत २-० असा पुढे आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिल याने सलामीला येत ६० चेंडूत ७० धावा केल्या होत्या. यामुळे दुसऱ्या सामन्यातही तोच रोहित शर्मा याच्याबरोबर सलामीला आला. सूर्यकुमार मधल्या फळीत फलंदाजी करतो. तेथे पाहिले तर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये इशान आणि सूर्यकुमारला अंतिम अकरामध्ये जागा मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 12:53 IST

संबंधित बातम्या