scorecardresearch

IND vs SL 3rd ODI: विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा फलंदाज

Virat Kohli New Records: विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे.

IND vs SL 3rd ODI: विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा फलंदाज
विराट कोहली (फोटो- ट्विटर)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने नाबाद १६६ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर विराट कोहली अनेक विक्रमांनी गवसणी घातली. विराट कोहलीने महेला जयवर्धनेला मागे टाकत वनडेत सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले.

स्टार फलंदाज विराट कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत महेला जयवर्धने या नंबरवर होता. मात्र विराटने त्याला मागे टाकले आहे. विराट कोहलीने ६३ धावा करताचा महेला जयवर्धनेला मागे टाकले.
श्रीलंकेचा माजी फलंदाज जयवर्धनेने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२६५० धावा केल्या आहेत.

आता विराट कोहली त्याच्या पुढे गेला आहे. जयवर्धनेने ४४८ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती, मात्र विराट कोहलीने २६८ व्या सामन्यातच त्याला मागे टाकण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने ४६ शतके झळकावली आहेत. त्याचवेळी जयवर्धनेला २० शतकेही झळकावता आली नाहीत.

सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर कायम –

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर सध्या अव्वल स्थानावर आहे. त्याने १८४२६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कुमार संगकाराचे (१४२३४) नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर रिकी पाँटिंग (१३७०४) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सनथ जयसूर्याचे (१३४३०) नाव चौथ्या स्थानावर आहे. विराटची नजर सध्या वनडेत १२७५४ धावा आहेत. तो लवकरच १३ हजार धावा पूर्ण करेल.

हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्सचा टाकले मागे; वनडे क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

विराट कोहलीने आपल्या खेळीत ११० चेंडूचा सामना केला. ज्यामध्ये त्याने १३ चौकार आणि ८ षटकार लगावले. या खेळीसह त्याने नाबाद १६६ धावा केल्या. ही खेळी त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरी सर्वोच्च धावासंख्या आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या वनडे क्रिकेटमधील ४६ वे शतक पूर्ण केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 18:23 IST

संबंधित बातम्या