IND vs SL : चर्चा विराटचीच, टी-२० क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

अखेरच्या सामन्यात भारताचा धावांचा डोंगर

श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज फलंदाजी करत २०० धावांचा टप्पा ओलांडला. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली. तर मधल्या फळीत मनिष पांडे, शार्दुल ठाकूर, विराट कोहली या फलंदाजांनी त्यांना उत्तम साथ दिली. विराटने पुण्याच्या गहुंजे मैदानावर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना १७ चेंडूत २६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

अवश्य वाचा – IND vs SL : दिग्गजांना धोबीपछाड देत विराट ठरला सर्वोत्तम कर्णधार, अनोख्या विक्रमाची नोंद

मात्र या छोटेखानी खेळीतही विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विराट २५० चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

दरम्यान, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी लंकन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. धवनने ५२ तर लोकेश राहुलने ५४ धावा केल्या. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. पंतला विश्रांती देऊन संघात संधी मिळालेल्या संजू सॅमसनला केवळ ६ धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही झटपट माघारी परतला. यानंतर विराट आणि मनिषने छोटेखानी भागीदारी करत भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs sl 3rd t20i virat kohli becomes first batsman to hit 259 fours in t20i cricket psd

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना