IND vs SL : दिग्गजांना धोबीपछाड देत विराट ठरला सर्वोत्तम कर्णधार, अनोख्या विक्रमाची नोंद

मानाच्या यादीत पटकावलं अव्वल स्थान

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, लंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना विराटने एक धाव घेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. १९६ डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली असून यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडीत काढला.

आतापर्यंत ६ कर्णधारांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आलेला आहे. पाहूयात या यादीमधले इतर कर्णधार….

  • विराट कोहली – १९६ डाव*
  • रिकी पाँटींग – २५२ डाव
  • ग्रॅम स्मिथ – २६५ डाव
  • अ‍ॅलन बॉर्डर – ३१६ डाव
  • महेंद्रसिंह धोनी – ३२४ डाव
  • स्टिफन प्लेमिंग – ३३३ डाव

दरम्यान अखेरच्या टी-२० सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोन्ही सलामीवीर अर्धशतकी खेळी करुन माघारी परतल्यानंतर, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. संजू सॅमसन, मनिष पांडे झटपट माघारी परतले. मात्र त्यानंतर विराटने मनिष पांडेच्या साथीने संघाचा डाव सावरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs sl 3rd t20i virat kohli complete 11 thousand runs as a captain in international cricket psd

ताज्या बातम्या