श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या म्हणाला की, टीम इंडियाचे लक्ष्य यंदाचा विश्वचषक जिंकण्याचे आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी२० सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत हार्दिक म्हणाला की, “टीम इंडिया विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे.” यासोबतच त्याने ऋषभ पंतच्या अपघातावरही आपले मत मांडले. पांड्या म्हणाला की, “संपूर्ण संघ पंतच्या पाठीशी उभा आहे.”

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या संतुलनावर नक्कीच मोठा परिणाम होईल पण टी२० फॉर्मेटमध्ये भारताचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या त्याच्या सहकाऱ्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे. शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावरील रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर त्यांच्या आलिशान कारला आग लागल्याने पंत थोडक्यात बचावले. आईला ‘सरप्राईज’ देण्यासाठी तो रुरकीला जात होता. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना मॅक्स हॉस्पिटलच्या आयसीयूमधून खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

आमच्या प्रार्थना ऋषभ पंतसोबत आहेत: हार्दिक

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच हार्दिकने ऋषभ पंतशी संबंधित प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला, “ऋषभ पंतला जे घडले ते दुर्दैवी होते. आमचे प्रेम, आमच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्हाला पुढील मूल्यमापन करणे आवश्यक आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतरांना संधी मिळेल. संघातील त्याच्या अनुपस्थितीने मोठा फरक पडेल.”

हेही वाचा: “कठीण काळात ज्यावेळेस मी दुखापतग्रस्त होतो…” आयपीएल २०२३ मधील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूने राहुल द्रविडबाबत केले मोठे भाष्य

उत्तराखंडमधील रुरकीजवळ शुक्रवारी (३० डिसेंबर) पंत यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये त्यांचा जीव वाचला. पंतच्या गुडघ्यात फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्या कपाळावर टाके पडले आहेत. हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे. या अपघातानंतर तो बराच काळ व्यावसायिक क्रिकेटपासून दूर राहू शकतो. पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान सहा महिने लागतील, असे मानले जात आहे.

‘२०२४ टी२० विश्वचषक जिंकण्याचे ध्येय’

हार्दिकला विश्वचषकाशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आला होता. टीम इंडियाने नव्या वर्षात विश्वचषक जिंकण्याचा संकल्प केला आहे. हार्दिक म्हणाला, “आमचा उद्देश आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकणे आहे. दुर्दैवाने, आम्ही २०२२ मध्ये ते करू शकलो नाही, परंतु आम्हाला या वर्षी ते अधिक चांगले करायचे आहे.”

‘व्यक्तिगत २०२२ माझे सर्वोत्तम वर्ष’

हार्दिक पांड्या त्याच्या गोलंदाजीवर म्हणाला, “मला एकच भाषा येते, ती म्हणजे मेहनत. दुखापत माझ्या हातात नाही, पण माझा या प्रक्रियेवर विश्वास आहे. २०२२ हे वैयक्तिकरित्या माझे सर्वोत्तम वर्ष होते. आम्ही विश्वचषक जिंकलो नाही, पण हा खेळाचा भाग आहे. संघाला अनेक देशांतील स्पर्धा जिंकण्यास मदत करणे हा माझा उद्देश आहे.”

हेही वाचा: IND vs SL: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ‘मिशन २०२४’! भारतीय टी२० संघाने ‘बिग थ्री’ ना स्पष्ट संकेत

हार्दिक कसोटीत पुनरागमन करू शकतो

कसोटीत परतल्यावर हार्दिक म्हणाला, “आता मला मर्यादित षटकांमध्ये पूर्णपणे खेळू द्या. त्यानंतर मी कसोटी क्रिकेटचा विचार करेन.हार्दिकच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, त्याने कसोटी क्रिकेट पूर्णपणे सोडलेले नाही आणि भविष्यात तो सर्वात लांब फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.”