scorecardresearch

IND vs SL: “मला हे माहित नव्हते धन्यवाद…” युजवेंद्र चहलच्या ‘गुगलीवर’ कुलदीप झाला ‘क्लीन बोल्ड’ Video व्हायरल

Kuldeep Yadav with Yuzvendra Chahal: ईडन गार्डन्स, कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर कुलदीप यादवची युजवेंद्र चहलने ‘चहल’ टीव्हीवर मुलाखत घेतली. यादरम्यान गोलंदाजीव्यतिरिक्त कुलदीपने फलंदाजी आणि सामनावीर म्हणून निवड झाल्याबद्दल सांगितले.

IND vs SL: “मला हे माहित नव्हते धन्यवाद…” युजवेंद्र चहलच्या ‘गुगलीवर’ कुलदीप झाला ‘क्लीन बोल्ड’ Video व्हायरल
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

Kuldeep Yadav interview with Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेल्या फिरकीपटू कुलदीप यादवची भूमिका, भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली. कुलदीपने १० षटकात ५१ धावा देत 3 बळी घेतले. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचे द्विशतकही पूर्ण केले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये युजवेंद्र चहल सहकारी फिरकीपटू कुलदीप यादवची मुलाखत घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुलदीप २०० आंतरराष्ट्रीय विकेट्सबद्दल अनभिज्ञ दिसत आहे. या विक्रमाची आठवण करून दिल्याबद्दल तो चहलचे आभार मानतो.

वास्तविक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरचा आहे. चहलने सहकारी फिरकीपटू कुलदीपला त्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवरील चमकदार कामगिरीबद्दल प्रश्न केला. यादरम्यान कुलदीपने आपला गेम प्लॅन सांगितला आणि टीम मीटिंगमध्ये श्रीलंकेच्या कोणत्या बॅट्समनला बाद करण्यासाठी त्याच्या टीमने खास स्ट्रॅटेजी बनवली होती.

युजवेंद्र चहलने दिला होता यशाचा गुरुमंत्र  

कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यानंतर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यात संवाद झाला होता. यादरम्यान कुलदीप यादवने सांगितले की, सामन्यापूर्वी चहलने त्याला श्रीलंकेचे खेळाडू, ते कसे खेळतात याबद्दल बरीच माहिती दिली होती, ज्याचा त्याने फायदा घेतला. यासाठी कुलदीपने आपल्या सहकारी खेळाडूचे आभार मानले. व्हिडिओ दरम्यान युजवेंद्र चहलने चेष्टा-मस्करी करत कुलदीप यादवची फिरकी घेतली. तो म्हणाला, “आधी मी सूर्यकुमार यादवचा फलंदाजी प्रशिक्षक होतो आणि आता कुलदीपचा गोलंदाजी प्रशिक्षक झालो आहे.”

हेही वाचा: IND vs SL: इशान, धवनच्या भवितव्यावर टांगती तलवार? केएल राहुलच्या खेळीवर रोहित शर्माचे मोठे विधान

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्याबद्दल चहलने कुलदीपचे अभिनंदन केले आणि म्हटले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्याबद्दल सर्वप्रथम तुझे अभिनंदन.” यावर कुलदीप म्हणाला, “मला याबद्दल माहिती नव्हती. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. २०० विकेट्स हे मोठे काम आहे. मी आता ते स्पष्ट करू शकत नाही. २०० विकेट्स ही मोठी गोष्ट आहे. याचा मला अभिमान वाटतो. हा प्रश्न अचानक आला त्यामुळे आता यावर काय बोलावे समजत नाही.”

हेही वाचा: IND vs SL: “कर्णधार रोहितच्या स्पष्टतेमुळे पाचव्या क्रमांकावर कायम?” केएल राहुलने संघातील निवडीबाबत केले सूचक विधान

कुलदीप यादवला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या भारतीय फिरकीपटूला गेल्या महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर सामनावीर ठरल्यानंतर संघातून वगळण्यात आले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील आपल्या गेम प्लॅनबाबत कुलदीप म्हणाला की, “माझे ध्येय गुड लेन्थ गोलंदाजी करणे हे होते. मी तेच केले. माझ्यासाठी दासून शनाकाची विकेट महत्त्वाची आहे, त्याला संघाच्या बैठकीत बाद करण्याची योजना होती.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 13:56 IST

संबंधित बातम्या