Rohit Sharma on KL Rahul: भारतीय कर्णधार रोहित शर्माला विश्वास आहे की डावखुऱ्या फलंदाजाचा अव्वल सहा फलंदाजांच्या क्रमवारीत समावेश केल्याने वैविध्य येईल. परंतु तो केवळ त्याच्या फायद्यासाठी फॉर्मात असलेल्या फलंदाजांमध्ये बदल करण्यास तयार नाही हे मान्य करतो. भारताने गुरुवारी कमी धावसंख्येच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार गडी राखून श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकली, परंतु अव्वल सहामध्ये फक्त उजव्या हाताच्या फलंदाजांचा समावेश आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक करणाऱ्या इशान किशनला संधी न देता संघ व्यवस्थापन २०२२ मध्ये सातत्य दाखवण्यासाठी शुभमन गिलला अधिक संधी देऊ इच्छित होते. रोहित म्हणाला, “टॉप ऑर्डरमध्ये डावखुरा फलंदाज असणे चांगले आहे पण ज्या खेळाडूंना संधी दिली जात आहे त्यांनी गेल्या एका वर्षात खूप धावा केल्या आहेत.”

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

त्यामुळे इशान किशनला त्याच्या संधीची वाट पाहावी लागेल हे त्याने उघडपणे सांगितले. तर वरिष्ठ खेळाडू शिखर धवनला संघात समाविष्ट करणे दुरापास्त वाटत आहे. तो म्हणाला, “आम्ही डाव्या हाताच्या फलंदाजाचा समावेश करू इच्छितो, परंतु आम्हाला आमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांची क्षमता माहित आहे आणि आमच्यासाठी या क्षणी ते खूप सकारात्मक आहे.”

हेही वाचा: IND vs SL: “कर्णधार रोहितच्या स्पष्टतेमुळे पाचव्या क्रमांकावर कायम?” केएल राहुलने संघातील निवडीबाबत केले सूचक विधान

रोहितने केएल राहुलचे कौतुक केले, ज्याच्या समावेशामुळे सूर्यकुमार यादव आणि किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडले. राहुलने १०३ चेंडूत केलेली नाबाद ६४ धावांची खेळी कमी धावसंख्येच्या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरली आणि भारतीय कर्णधार त्यावर खूश झाला. तो म्हणाला, “हा एक कमी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा सामना होता पण असे सामने तुम्हाला खूप काही शिकवतात. केएल बर्‍याच दिवसांपासून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे, यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. आणि अनुभवी खेळाडू संघाला सामना जिंकवून देतो याचे समाधान देखील मिळवून देतो.”

शिखर धवनच्या बाबतीत रोहितने केले स्पष्ट

“आम्हाला डावखुरा फलंदाज संघात असावा असं सध्यातरी वाटत नाही. कारण सध्या आमचा संघ समतोल आहे. आमच्या कडे सध्या असलेले उजव्या हाताचे फलंदाज ज्या पद्धतीची कामगिरी करतात त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यांनी दर्जेदार कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी फलंदाजीमध्ये बदल करण्याच्या विचारात अजिबात नाही,” असं रोहित शर्माने अतिशय स्पष्टपणेच सांगून टाकलं.

हेही वाचा: IND vs SL 2nd ODI: हार्दिक-विराट मध्ये बेबनाव? सोशल मीडियावर चाहत्यांनी उठवल्या वावड्या

केएल राहुलची आकडेवारी

खूप काळानंतर राहुलच्या बॅटमधून चांगली खेळी बाहेर पडली. त्याने एकप्रकारे टिकाकरांना चोख उत्तर दिले आहे. टी२० मध्ये सलामीला फलंदाजी करणाऱ्या या ३० वर्षीय खेळाडूची पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजीची आकडेवारी विक्रमी आहे. या क्रमांकावर त्याने १५ एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना ५४.२५च्या सरासरीने ६५१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.