IND vs SL 1st Test Day 1 Live Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीत पहिला दिवस भारतीय संघाच्या नावे राहिला. पहिल्या दिवशी टीम इंडियाने फक्त २ विकेट्स गमावत २८८ धावा केल्या आहेत. यामध्ये यशस्वी जैस्वाल ३२ धावा करत धावबाद झाला. तर केएल राहुल क्रॅम्प्स येत अशल्यामुळे ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट होत माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. तर कर्णधार शुबमन गिल १६ धावा करत प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. देवदत्त पडिक्कल १३१ तर ऋषभ पंत २७ धावा करत खेळत आहेत.
पावसामुळे सामन्यात व्यत्यय
गॉलमध्ये तिसऱ्या सत्रात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने सामना थांबवण्यात आला आहे. तोपर्यंत भारताने २ बाद २३९ धावा केल्या आहेत.
शुबमन गिल बाद
श्रीलंकेचा सर्वाेत्कृष्ट फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याच्या फिरकीच्या जाळ्यात शुबमन गिल अडकला. जयसूर्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गिल १६ धावा करत बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानावर पोहोचला आहे.
देवदत्त पडिक्कलचं शतक
केएल राहुल मैदानाबाहेर
केएल राहुल तिसऱ्या सत्रात फलंदाजीला आल्यानंतर रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला आहे. दुसऱ्या सत्रात फलंदाजी करतानाच राहुलला त्रास होत होता. त्याला सातत्याने क्रॅम्पस येत होते. त्याच्या हातात आणि मग पायात क्रॅम्पस येऊ लागले. तिसऱ्या सत्रात पुन्हा मैदानावर आल्यानंतर तर त्याला अधिक त्रास जाणवू लागला. क्रॅम्पसमुळे त्याच्या उजव्या हाताची बोटं वाकल्याचं स्पष्ट दिसत होतं. तर पायऱ्या चढत ड्रेसिंग रूममध्ये जाताना त्याला अधिक त्रास होत होता.
राहुल-पडिक्कलची १५० धावांची भागीदारी
केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी रचली आहे. यासह भारताने दुसरं सत्रदेखील आपल्या नावे केलं आहे. यासह टीब्रेकपर्यंत टीम इंडियाने १ विकेट गमावत १९७ धावा केल्या आहेत.
केएल राहुलचं अर्धशतक
देवदत्त पडिक्कलपाठोपाठ राहुलने शतक झळकावलं आहे. राहुलने ५ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी साकारली आहे. राहुल-पडिक्कलची जोडी मैदानावर कायम असून दोघांनी १०० अधिक धावांची भागीदारी केली आहे.
देवदत्त पडिक्कलचं अर्धशतक
देवदत्त पडिक्कलने आपल्या शानदार खेळीच्या बळावर अर्धशतक साकारलं आहे. सराव सामन्यानंतर आता पहिल्या कसोटीत संधी मिळताच पडिक्कलने आपला फॉर्म दाखवून दिला. पडिक्कलने ४ चौकार व एका षटकारासह ही खेळी साकारली.
पाऊस थांबला! दुसऱ्या सेशनचा खेळ सुरू
पावसामुळे बराच वेळ सामना थांबवण्यात आला होता. पण आता पाऊस थांबल्यानंतर दुसऱ्या सेशनचा खेळ सुरू झाला आहे.
कधी सुरू होणार सामना?
गॉलमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात व्यत्यय आला. यानंतर आऊटफिल्ड ओली असल्यामुळे बराच वेळ सामना थांबला होता. आता पंचांनी निरीक्षण केल्यानंतर सामना अखेरीस २ वाजता सुरू होणार आहे.
पावसामुळे सामना सुरू होण्यास सुरूवात
भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत भारताने लंचब्रेकपर्यंत १०१ धावांचा पल्ला गाठला आहे. पण लंचब्रेकनंतर आता सामना सुरू होण्यास विलंब होत आहे. पहिल्या दिवशी पावसाची चिन्ह असल्याने पाऊस पडू शकतो अशी शक्यता होती. सामना वेळेत सुरू झाल्यानंतर आता लंचब्रेकदरम्यान पावसाने हजेरी लावली आहे.
भारताच्या १०० धावा पूर्ण
भारतीय संघाने पहिल्या सत्रात २७ षटकांत १ बाद १०१ धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कल व केएल राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी साकारली आहे.
Yashasvi Jaiwal Run Out: यशस्वी जैस्वाल रनआऊट
यशस्वी जैस्वालच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला आहे. केएल राहुलने हलक्या हाताने चेंडू खेळल्यानंतर तो धाव घेण्यासाठी गेला, तर गोलंदाजाच्या रनअपमुळे यशस्वी जैस्वाल पडला. जैस्वाल उठून चेंडूकडे पाहत धावायला गेला आणि पुन्हा मागे आला. पण त्याने केएल राहुलकडे पाहिलं नव्हतं. यशस्वी जैस्वाल माघारी येईपर्यंत राहुल निम्मी क्रीज ओलांडून पुढे आला होता. अखेरीस दोन्ही फलंदाज एकाच टोकाला आल्याने यशस्वी जैस्वाल धावबाद झाला.
IND vs SL Galle Test Live: भारताच्या १० षटकांत किती धावा?
केएल राहुल व यशस्वी जैस्वाल या भारताच्या सलामी जोडीने गॉलमध्ये चांगली सुरूवात केली आहे. दोघांनी १० षटकांत ४० धावा केल्या आहेत. यशस्वी २५ धावा तर केएल राहुल १३ धावा करत खेळत आहे.
IND vs SL 1st Test Live: सामन्याला सुरूवात
भारत-श्रीलंका कसोटीला सुरूवात झाली आहे. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालने चौकार लगावत भारताचं खातं उघडलं. तर सलामीवीर केएल राहुल त्याचा जोडीदार आहे.
India Playing 11 For IND vs SL Galle Test: भारताची प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा
श्रीलंकेची प्लेईंग इलेव्हन:
लाहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा(कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला(यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो
IND vs SL 1st Test Toss Update: कोणी जिंकली सामन्याची नाणेफेक?
भारत आणि श्रीलंका गॉल कसोटी सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर श्रीलंकेचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सराव सामन्यात जशी प्लेईंग इलेव्हन होती, तोच संघ खेळणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कल खेळणार आहे. तर बुमराहच्या जागी प्रसिध कृष्णा मोहम्मद सिराजची साथ देईल.
IND vs SL 1st Test Toss: नाणेफेक किती वाजता होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉल येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. तर सामन्याची नाणेफेक ९.३० वाजता होईल.
पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट
भारत-श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यावर मात्र पावसाचं सावट आहे. हवामान अंदाजानुसार गॉलमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून सकाळच्या सत्रात काही सरी बरसण्याचा अंदाज आहे. तापमान साधारण ३०-३१°सेल्सियस राहण्याची शक्यता आहे, तर दमट हवेमुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. भारताच्या सराव सत्रावरही शुक्रवारी पावसाचा परिणाम झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात पावसामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता कायम आहे.
१५ ऑगस्ट रोजी गॉलच हवामना कसं असणार
सकाळी ८ वाजता – ६५ टक्के पाऊस
सकाळी ९ वाजता – ७५ टक्के पाऊस
सकाळी १० वाजता ४० टक्के पाऊस
दुपारी १२ वाजता – २९ टक्के पाऊस
दुपारी २ वाजता – २० टक्के पाऊस
