India vs Sri Lanka Asian Games 2026 Semi final Highlights: भारतीय संघाने सेमीफायनल सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने श्रीलंका संघाला ४५ धावांवर सर्वबाद केलं आणि भारताने १२५ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने भारताला चांगली सुरूवात करून दिली, त्यानंतर इशान किशनने भारताचा डाव सावरत १६९ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी आणि संपूर्ण संघाने फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत मोठा विजय नोंदवला. आता सुवर्णपदकासाठी भारताचा सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे.
India vs Sri Lanka asian games 2026 semi final Highlights: भारत आणि श्रीलंका आशियाई क्रीडा स्पर्धेचे हायलाईट्स
Asian Games: भारत-पाकिस्तान सुवर्णपदकाचा सामना किती वाजता सुरू होणार? कधी-कुठे खेळवला जाणार? जाणून घ्या
Asian Games 2026 Cricket Live: भारत-पाकिस्तान फायनल
भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ सुवर्णपदकासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
अभिषेक शर्माच्या १०व्या षटकात चौथ्या चेंडूवर संजूने करूणारत्नेला स्टंपिंग करत बाद केलं. तर पाचव्या चेंडूवर फर्नांडोला क्लीन बोल्ड करत श्रीलंकेला सर्वबाद केलं. श्रीलंकेचा संघ अवघ्या ४५ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने १२५ धावांनी मोठा विजय मिळवला. यासह टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
अभिषेक शर्माच्या १०व्या षटकात एक धाव घेण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेने आठवी विकेट गमावली. तिलक वर्माने किलर थ्रो करत रत्नायकेला धावबाद केलं. आता भारताला विजयासाठी फक्त २ विकेट्सची गरज आहे.
IND vs SL Semi final Live: श्रीलंका संघाला सातवा धक्का
वॉशिंग्टन सुंदरने सातव्या षटकात वानुजा सहनला झेलबाद करत भारताला सातवी विकेट मिळवून दिली. यासह आता अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताला फक्त ३ विकेट्सची गरज आहे.
IND vs SL live: श्रीलंकेने गमावली सहावी विकेट
श्रीलंका संघाने पाचव्या षटकात एक धाव घेण्याच्या नादात सहावी विकेट गमावली. फर्नांडोला अक्षर पटेल व संजू सॅमसनने झेलबाद केलं. यासह पाच षटकांत श्रीलंका संघाने ६ विकेट्स गमावत ३१ धावा केल्या.
चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने श्रीलंकेचा कर्णधार अराच्चिगेला झेलबाद करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. वैभव सूर्यवंशीने चांगला झेल टिपत त्याला बाद केलं. तर षटकातील चौथ्या चेंडूवर बंदारा झेलबाद झाला.
IND vs SL live: कमालीचा रनआऊट
अक्षर पटेलच्या दुसऱ्या षटकात रवी बिश्नोईने कमालीचा डायरेक्ट थ्रो मारत नुवानिदू फर्नांडोला धावबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली.
IND vs SL Semi Final Live: जस्सीची कमाल सुरूवात
भारताने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कऱण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खूप वाईट झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत श्रीलंकेला मोठे धक्के दिले. दुसऱ्या चेंडूवर सिनेथ जयवर्धने याला पायचीत केलं. तर पाचव्या चेंडूवर संजूने एका हाताने झेल टिपत लिवेराला झेलबाद केलं आणि पहिल्या षटकात भारताने ०-२ अशी सुरूवात केली.
इशान किशनच्या उत्कृष्ट ८० धावांच्या खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या. निशिनमधील खेळपट्टी धावा करण्यासाठी फारच अवघड होती आणि फिरकीपटूंना मदत करणारी होती. भारताने पहिल्याच षटकापासून विकेट्स गमावण्यास सुरूवात केली, एका टोकाकडून विकेट्स पडत असताना वैभवने सुरूवातीला संघाचा डाव सावरला आणि त्याने ३८ धावांची खेळी केली. यानंतर इशान किशनने ४६ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. यासह श्रीलंकेला भारताने विजयासाठी १७० धावांचं मोठं आव्हान दिलं आहे.
१९व्या षटकात श्रीलंकेच्या अराच्चिगेने अजून एक कमालीचा झेल टिपत भारताला सातवा धक्का दिला. फलंदाज गोलंदाज आणि चाहत्यांसह कोणाचाही त्याच्या या झेलवर विश्वास बसेना. यासह दुबे ३ धावा करत बाद झाला.
Ishan Kishan Fifty: इशान किशनचं महत्त्वपूर्ण अर्धशतक
जपानमधील धावा करण्यासाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर इशान किशनने एका टोकाने संघाला डाव सावरला आणि सातत्याने धावा केल्या. यासह इशानने ३४ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक झळकावत संघाचा डाव उचलून धरला आहे.
India vs Sri lanka live: तिलक वर्मा स्टंपिंग
१५व्या षटकात फर्नांडोच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा अखेरच्या चेंडूवर स्टंपिंग होत बाद झाला. यासह भारताला सहावा धक्का बसला. भारताने १५ षटकांत आतापर्यंत ६ बाद १२५ धावा केल्या आहेत.
IND vs SL Live: भारताला पाचवा धक्का
१४व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेल झेलबाद झाला. श्रीलंकेच्या अराच्चिगेने कमालीचा झेल टिपला. यासह १४ षटकांत भारताने ५ विकेट्स गमावत ११४ धावा केल्या आहेत.
IND vs SL Live: श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड
वानुजा सहन याने १०व्या षटकात कमालीचा चेंडू टाकत कर्णधार श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड करत भारताला चौथा मोठा धक्का दिला. यासह भारताने १० षटकांत ४ बाद ८८ धावा केल्या आहेत.
IND vs SL Live: वैभव सूर्यवंशी झेलबाद
पॉवरप्लेमध्ये भारतासाठी चांगली धावसंख्या उभारल्यानंतर वैभव सूर्यवंशी झेलबाद होत माघारी परतला. श्रीलंकेचा फिरकीपटू अराच्चिगेने अगदी अभिषेक शर्माप्रमाणे सेम टू सेम शॉर्ट थर्डला झेलबाद केलं.
https://twitter.com/dilseanilbansal/status/2105518369990648161
IND vs SL Live: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी
वैभव सूर्यवंशीने चौथ्या षटकांतील अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचले. त्यानंतर त्याने पाचव्या षटकात चौकार, षटकार, चौकार अशी फटकेबाजी केली. यासह पाचव्या षटकात त्याने 15 धावा कुटल्या. यानंतर सहाव्या षटकातही एक षटकार खेचला. वैभवच्या फटकेबाजीच्या मदतीने भारताने पॉवरप्लेमध्ये २ विकेट्स गमावत ५८ धावा केल्या आहेत.
IND vs SL Live updates: संजू सॅमसन क्लीन बोल्ड
संजू सॅमसनने सावध सुरूवातीनंतर आपली विकेट गमावली. तिसऱ्या षटकात रत्नायकेने संजूला क्लीन बोल्डकरत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. यासह ३ षटकांत भारताने २४ धावा करत २ विकेट्स गमावल्या.
IND vs SL Live: भारताला पहिला धक्का
वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकात चौकार लगावत सुरूवात केली, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. यासह १२ धावांवर भारताला पहिला धक्का बसला.
IND vs SL Live: भारताच्या डावाला सुरूवात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सेमीफायनल सामन्याला सुरूवात झाली असून भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला आहे. वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन व वैभव सूर्यवंशी तिघेही खेळताना दिसणार आहेत.
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह
IND vs SL Toss: नाणेफेक
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सेमीफायनल सामन्याची नाणेफेक श्रीलंकेने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह भारताचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.
Pakistan in Final: पाकिस्तानची फायनलमध्ये धडक
आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिला सेमीफायनल सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला गेला. ओल्या आऊटफिल्डमुळे १३ षटकांचा सामना खेळवण्यात आला. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ११२ धावा केल्या, तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने ११.३ षटकांत सहज लक्ष्य गाठत ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असून सुवर्णपदकासाठी लढेल.
India vs Sri lanka SF: भारत आणि श्रीलंका लाईव्ह
आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात आज खेळवला जाणार आहे. जपानमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर सामना वेळेत सुरू होण्याची अपेक्षा आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी १० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ९.३० वाजता होईल.

IND vs SL Asian Games 2026 Semi Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंरकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
