दक्षिण भारताचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाचे वेड सर्वसामान्य प्रेक्षकांनाच नाही तर क्रिकेटपटूंनाही लागले. या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावरील हुक स्टेपपासून अल्लू अर्जुनच्या दाढीखालून हात फिरवण्याची स्टाइलही अनेकजण कॉपी करत आहे. आता अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. जडेजाने मैदानातच अल्लू अर्जुनची स्टाइल कॉपी केली आहे.

लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात जडेजाने ”मै झुकेगा नही” स्टाइलने सेलिब्रेशन केले. लंकेचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश चंडीमल जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. त्यानंतर जडेजाने हे सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ordered 5 kg paneer online shocking thing came out as soon as it was cut online fraud news
VIDEO: गृहिणीनं ऑनलाईन मागवलं ५ किलो पनीर; कापताच आत निघाली धक्कादायक गोष्ट
they were cheating people by mixing water in petrol people of jaipur exposed watch viral video
तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO
Ex stole toilet after breakup viral photo
हे काय भलतंच! Breakup केला म्हणून प्रेयसीचे चोरून नेले टॉयलेट? पाहा हा Photo
Holi 2024 Before the festival of holi a funny video of drunkards on holi celebration
Holi 2024: देशी दारु अशी चढली की…दारुड्यांचं होळी सेलिब्रेशन VIDEO पाहून व्हाल लोटपोट

हेही वाचा – IPL 2022 : तारीखही ठरली आणि दुसरी खुशखबरही मिळाली..! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल

जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुष्पा चित्रपटातील फोटो शेअर केला होता. त्यासोबतच त्याने स्वत:चा पुष्पाच्या लूकमधील देखील फोटो शेअर केला होता. ‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळाली.