टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ५० षटकांच्या क्रिकेट इतिहासात इतिहास रचण्याच्या जवळ आहे. सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी करण्यापासून रोहित शर्मा केवळ एक शतक दूर आहे. रोहितच्या नावावर २३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९ शतके आणि ९५३७ धावा आहेत. दुसरीकडे, रिकी पाँटिंगने ३७५ सामन्यांमध्ये ४२च्या सरासरीने ३० शतके आणि १३७०४ धावा केल्या आहेत. सामन्यात समालोचन करताना समालोचक संजय मांजरेकर आणि गौतम गंभीर यांच्यात  रोहित आणि पाँटिंगची तुलना करता येईल का? यावर खूप मोठी चर्चा झाली.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. मात्र, सध्या तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. मात्र शर्मा लवकरच आपल्या चमकदार फॉर्ममध्ये परततील अशी सर्वांना अपेक्षा आहे. आकडेवारी बाबत बोलायचे झाल्यास रोहितने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या पहिल्या ६ वर्षात केवळ दोन शतके झळकावली होती. २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीने त्याला सलामीची जबाबदारी दिली आणि या भारतीय क्रिकेटपटूनेही ही संधी दोन्ही हातांनी मिळवली.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Rohit Sharma's reaction to Dhoni Karthik
MS Dhoni : ‘धोनी अमेरिकेला येत आहे पण…’, टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा मोठा खुलासा
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
Thipse and Gokhale
हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा! ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेबाबत ठिपसे, गोखले यांचे मत

हेही वाचा: Captaincy of Rohit: “रोहितच्या कर्णधार पदाबाबत मला…” हार्दिक पांड्याने वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनाबाबत केले मोठे विधान

मर्यादित षटकांच्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनंतरचा तिसरा फलंदाज होता. यावेळी अनेक लोक रोहित शर्मा आणि रिकी पाँटिंगची तुलना करत असले तरी गौतम गंभीरने याबाबत आपली बाजू मांडली.

रिकी पाँटिंगचा उपखंडातील रेकॉर्ड खूपच खराब : गौतम गंभीर

गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला रिकी पाँटिंगच्या पुढे स्थान दिले आहे. भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गेल्या चार-पाच वर्षांत त्याने इतकी शतके झळकावली आहेत. गेल्या पाच-सहा वर्षापूर्वी रोहित शर्मा इतका सातत्य नव्हता. गेल्या पाच-सहा-सात वर्षांत त्याने जवळपास २० शतके झळकावली आहेत.”

हेही वाचा: PAK vs NZ: ‘अंपायरला असा चेंडू लागला की…’, त्यानंतर रागाच्या भरात त्याने जे काही केले ते पाहाच, Video व्हायरल

रोहित शर्मा आणि पाँटिंग यांच्यात गंभीरची अचानक मोठी तुलना झाल्याने पॅनेलचे सहकारी आणि माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आश्चर्यचकित झाले. संजय मांजरेकर गौतम गंभीरशी पूर्णपणे सहमत नव्हते, त्यावर गंभीर म्हणाला, “रोहित शर्मा हा रिकी पाँटिंगपेक्षा चांगला खेळाडू आहे. कारण रिकीने उपखंडात फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.” रोहित शर्माने उपखंडात एकूण १३ एकदिवसीय शतके झळकावली आहेत तर रिकी पाँटिंगने उपखंडात ३० पैकी केवळ सहा शतके झळकावली आहेत.