IND vs SL Rohit Sharma Washington Sundar Funny Video : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावरील त्याच्या मजेशीर गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता असाच काहीसा प्रकार कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामन्यात घडला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो वॉशिंग्टन सुंदरला काहीतरी म्हणत आहे आणि त्याचे हे शब्द स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले. रोहित शर्माचा वॉशिंग्टन सुंदरबरोबरचा मजेशीर संवाद ऐकून समालोचकांनाही हसू आवरले नाही.

खरे तर हे प्रकरण श्रीलंकेच्या डावातील २९व्या षटकातील आहे. दुनिथ वेल्लालगे ७ धावा करून खेळत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यूची अपील करण्यात आली, यावेळी अंपायरने दुनिथला आऊट घोषित केले नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरने डीआरएस घेण्यासाठी रोहित शर्माकडे बघायला सुरुवात केली. चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला, हे मैदानावरील कोणालाही समजू शकले नाही. तसेच रोहित स्लिपमध्ये उभा असल्याने स्टंम्पच्या मागे होता. त्यामुळे तिथून चेंडू नक्की कुठे पहिल्यांदा लागला हे सांगू शकत नव्हता.

Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
AP Dhillon Salman Khan
AP Dhillon : पंजाबी गायकाच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; सलमान खानचा उल्लेख असलेल्या पोस्टमुळे खळबळ!
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
raped on dog up
Animal Cruelty on Dog: विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हायरल व्हिडीओनंतर आरोपीला अटक

रोहित-सुंदरचा व्हिडीओ व्हायरल –

यानंतरही वॉशिंग्टन सुंदर आशेने कर्णधार रोहित शर्माकडे डीआरएस घेण्यासाठी बघत होता. यावेळी रोहित शर्मा स्वतः गोंधळलेला दिसला. त्याने केएल राहुललाही विचारण्याचा प्रयत्न केला, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तरीही वॉशिंग्टन सुंदर रोहितकडे सतत बघत होता. त्यामुळे रोहित थोडा संतापला आणि त्याच्या खास शैलीत सुंदरला विचारले, “यू टेल मी…मेरे को क्या देख रहा है.” यानंतर रोहित शर्मा जोरजोरात हसायला लागला. आता घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IPL 2025 : ‘या’ खेळाडूंवर आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदी? सर्वच संघ चिंतेत! नेमकं कारण काय? जाणून घ्या

टीम इंडियाची हाराकिरी; जिंकता जिंकता सामना झाला टाय –

सामन्याबद्दल बोलायचे तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत आठ गडी गमावून २३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४७.५ षटकांत १० गडी गमावून २३० धावा केल्या. भारताला विजयासाठी १५ चेंडूत अवघ्या एका धावेची गरज असताना शिवम दुबे बाद झाला. यानंतर अर्शदीप सिंग फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI : टीम इंडियाची हाराकिरी; जिंकता जिंकता सामना झाला टाय, शिवम दुबेचा एलबीडब्ल्यू ठरला वादग्रस्त

या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (४ ऑगस्ट) आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारताकडून पहिल्या वनडेत कर्णधार रोहित शर्माने ५८ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५६ वे अर्धशतक झळकावले. त्याच वेळी, श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चारिथ असलंका यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.