IND vs SL Rohit Sharma Washington Sundar Funny Video : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावरील त्याच्या मजेशीर गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता असाच काहीसा प्रकार कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामन्यात घडला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो वॉशिंग्टन सुंदरला काहीतरी म्हणत आहे आणि त्याचे हे शब्द स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले. रोहित शर्माचा वॉशिंग्टन सुंदरबरोबरचा मजेशीर संवाद ऐकून समालोचकांनाही हसू आवरले नाही. खरे तर हे प्रकरण श्रीलंकेच्या डावातील २९व्या षटकातील आहे. दुनिथ वेल्लालगे ७ धावा करून खेळत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यूची अपील करण्यात आली, यावेळी अंपायरने दुनिथला आऊट घोषित केले नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरने डीआरएस घेण्यासाठी रोहित शर्माकडे बघायला सुरुवात केली. चेंडू आधी बॅटला लागला की पॅडला, हे मैदानावरील कोणालाही समजू शकले नाही. तसेच रोहित स्लिपमध्ये उभा असल्याने स्टंम्पच्या मागे होता. त्यामुळे तिथून चेंडू नक्की कुठे पहिल्यांदा लागला हे सांगू शकत नव्हता. रोहित-सुंदरचा व्हिडीओ व्हायरल - यानंतरही वॉशिंग्टन सुंदर आशेने कर्णधार रोहित शर्माकडे डीआरएस घेण्यासाठी बघत होता. यावेळी रोहित शर्मा स्वतः गोंधळलेला दिसला. त्याने केएल राहुललाही विचारण्याचा प्रयत्न केला, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तरीही वॉशिंग्टन सुंदर रोहितकडे सतत बघत होता. त्यामुळे रोहित थोडा संतापला आणि त्याच्या खास शैलीत सुंदरला विचारले, "यू टेल मी…मेरे को क्या देख रहा है.” यानंतर रोहित शर्मा जोरजोरात हसायला लागला. आता घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेही वाचा - IPL 2025 : ‘या’ खेळाडूंवर आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदी? सर्वच संघ चिंतेत! नेमकं कारण काय? जाणून घ्या टीम इंडियाची हाराकिरी; जिंकता जिंकता सामना झाला टाय - सामन्याबद्दल बोलायचे तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत आठ गडी गमावून २३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४७.५ षटकांत १० गडी गमावून २३० धावा केल्या. भारताला विजयासाठी १५ चेंडूत अवघ्या एका धावेची गरज असताना शिवम दुबे बाद झाला. यानंतर अर्शदीप सिंग फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. हेही वाचा - IND vs SL 1st ODI : टीम इंडियाची हाराकिरी; जिंकता जिंकता सामना झाला टाय, शिवम दुबेचा एलबीडब्ल्यू ठरला वादग्रस्त या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (४ ऑगस्ट) आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारताकडून पहिल्या वनडेत कर्णधार रोहित शर्माने ५८ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५६ वे अर्धशतक झळकावले. त्याच वेळी, श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चारिथ असलंका यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.