Sonal Dinusha Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सोनल दिनुशाच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सोनल हा भारत- श्रीलंका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सोनल दिनुशाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
सोनल दिनुशाने भारतीय संघाविरुद्ध खेळताना इतिहासाला गवसणी घातली आहे. या कसोटी मालिकेतील चारही डावात फलंदाजी करताना त्याने ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडच्या केन बॅरिंगटननंतर तो भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील सुरुवातीच्या ४ डावात सलग ४ वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. केन बॅरिंगटन यांनी हा रेकॉर्ड १९५९ मध्ये केला होता. आता ६७ वर्षांनंतर सोनल दिनुष्का हा अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.
भारताविरुद्ध खेळताना बॅरिंगटन यांनी पहिल्या ४ डावात ५६,८०, ८० आणि ८७ धावांची खेळी केली होती. त्याआधी क्ल्याड वॉलकॉट यांनी १५२, ६८, ५४ आणि १०८ धावांची खेळी केली होती. तर वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज एव्हरटन यांनी १२८, १९४, १६२ आणि १०१ धावांची खेळी केली होती. तर या यादीत पहिल्या स्थानी असलेल्या डगलस जार्डीन यांनी ७९, ८५, ६० आणि ६१ धावांची खेळी केली होती.
पण सोनल दिनुशासाठी हा रेकॉर्ड खास आहे.कारण सोनल दिनुशा हा भारतीय संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा आशियातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी आशियातील कुठल्याही फलंदाजाला हा रेकॉर्ड आपल्या नावावर करता आलेला नाही. सोनलने भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १०० आणि ८४ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने १०३ धावा केल्या. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीत त्याने पुन्हा एकदा मोठी खेळी केली आहे.
श्रीलंकेचं दमदार पुनरागमन
श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या २९० धावांवर आटोपला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने ३५० धावांचा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेकडून कामिल मिशाराने ३२ धावांची खेळी केली. तर पसिंदू सूर्याबंदारा ९२ धावांवर माघारी परतला. तर कामिंदू मेंडिसने ५५ धावांची खेळी केली. तर केशरा नुवांथाने ४६ धावा केल्या. यादरम्यान सोनल आणि नुवांथाने दमदार शतकी भागीदारी केली.
