टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका २-१ ने जिंकली आहे. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने अप्रतिम शतक झळकावले आणि टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमार यादवचे हे टी-२० मधील तिसरे शतक होते. या शानदार खेळीनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही सूर्याची मजेदार मुलाखत घेतली. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला.

बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल द्रविडने सूर्यकुमार यादवशी त्याच्या खेळीबद्दल चर्चा केली. यावेळी राहुल द्रविडनेही विनोद केला आणि सांगितले की, आमच्यासोबत असे फलंदाज आहेत, ज्यांनी मला लहानपणी फलंदाजी करताना पाहिले नसेल. या प्रकरणावर दोघेही मोठ्याने हसतात दिसतात.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

राहुल द्रविड म्हणाला की, ”जेव्हा जेव्हा मला वाटते की यापेक्षा चांगली टी-२० इनिंग असू शकत नाही, तेव्हा तुम्ही आणखी एक अप्रतिम खेळी खेळता.” राहुल द्रविडने सूर्याला विचारले की त्याची सर्वात खास खेळी कोणती आहे, त्यावर सूर्याने सांगितले की, त्याला कठीण परिस्थितीत फलंदाजी करायला आवडते. त्यामुळे कोणतीही एक खेळी निवडणे सोपे नाही.

सूर्यकुमार यादवने सांगितले की, तो काही शॉट्स अगोदर विचार करुन ठेवतो, पण काही शॉट्स चेंडूनुसार खेळले जातात. तो क्षेत्ररक्षणाची काळजी घेतो आणि आपला खेळ करतो. नेट प्रॅक्टिस करतानाही तो मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.ज्यामध्ये तो आपल्या मेंदू आणि मनगटाचा वापर करतो. नेटमध्ये चेंडू बॅटवर व्यवस्थित असेल तर तो सराव करतो.

या स्टार फलंदाजाने सांगितले की, माझ्या कारकिर्दीत कुटुंबाचीही मोठी भूमिका आहे, त्याच्या पत्नीने त्याला चांगल्या फिटनेससाठी प्रेरित केले आहे. आम्ही सर्वजण या टप्प्याचा खूप आनंद घेत आहोत. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ११२ धावा केल्या होत्या. सूर्याचे कारकिर्दीतील हे तिसरे शतक होते.

हेही वाचा – BPL 2023: पंचाच्या ‘या’ निर्णयावरुन संतापला शाकिब अल हसन; LIVE मॅचमध्ये पुन्हा घातला वाद, पाहा VIDEO

भारत आणि श्रीलंका यांच्यात राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने ९१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १३७ धावांवर ऑलआऊट झाला होता. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने ११२ धावा केल्या, तर अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले. टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.