Ind vs SL U-19 Test : पहिल्या डावात भारताच्या पवन शहाचं झुंजार द्विशतक

पहिल्या डावात भारताकडून ६१३ धावांचा डोंगर

द्विशतकवीर पवन शहा

१९ वर्षाखालील भारत संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर तरुण खेळाडूंनी आपली छाप पाडायला सुरुवात केली आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ६१३ धावांचा डोंगर उभा केला आहे. पहिल्या डावात भारताच्या पवन शहाने आक्रमक द्विशतक झळकावलं आहे. पवनने ३३२ चेंडूंमध्ये २८२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. युवा पवनने तब्बल ८ तास खेळपट्टीवर तळ ठोकून श्रीलंकेच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. मात्र खेळपट्टीवर चांगला जम बसलेल्या पवनचं त्रिशतक केवळ १८ धावांनी हुकलं. याआधी सलामीवीर अथर्व तायडेनेही ११७ धावांची शतकी खेळी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs sl u 19 test indian batsman pavan shah scores double ton against sri lanka

ताज्या बातम्या