IND vs SL Why There Was No Super Over When 1st ODI Match Tied: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा पहिलाच रोमांचक एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना शेवटपर्यंत फारच रोमांचक झाला आणि परिणामी या पहिल्या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २३० धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाही २३० धावा करत ऑलआऊट झाली. पण भारताने २३० धावा करत ऑलआऊट झाल्याने सामना बरोबरीत सुटला, तरीही सुपर ओव्हर का झाली नाही, वाचा कारण. हेही वाचा - IND vs SL: “मी फार काही बोलणार नाही…” १४ चेंडूत एकही धाव न घेता भारताचा सामना टाय झाल्याने रोहित शर्मा पाहा नेमकं काय म्हणाला? एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अनिर्णित सामने खेळण्याच्या बाबतीत भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. या फॉरमॅटमधील हा भारताचा १०वा टाय सामना होता, ज्यामुळे ते वेस्ट इंडिजनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत संपल्यानंतरही या सामन्यात सुपर ओव्हर झाली नाही. पण याचे कारण काय आहे, जाणून घेऊया. हेही वाचा - Rohit Sharma: हिटमॅन नंबर वन! रोहित शर्माने रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला कर्णधार IND vs SL पहिल्या वनडे सामन्यात Super Over का झाली नाही? भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांनी २३० धावा केल्याने सामना अनिर्णित राहिला. पण २३० धावा केल्यानंतरही सुपर ओव्हर झाली नाही. जर कोणताही सामना टाय झाला तर एका संघाच्या बाजूने निकाल लागण्यासाठी सुपर ओव्हर केली जाते. भारत-श्रीलंकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यातही सुपर ओव्हर पाहायला मिळाली आणि नंतर टीम इंडियाने तो सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये जिंकला. पण एकदिवसीय सामन्यानंतर हे दिसले नाही. एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हर न होण्यामागचे कारण म्हणजे कोणत्याही द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सुपर ओव्हरचा नियम लागू होत नाही. एकदिवसीय मध्ये, सुपर ओव्हर फक्त मोठ्या स्पर्धांमध्ये होते. उदाहरणार्थ, विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा आशिया चषक यांसारख्या स्पर्धांमध्ये, सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओव्हरचा वापर केला जातो, कारण तेथील संघांमध्ये गुण वितरीत केले जातात. बाद किंवा निर्णायक सामने प्रत्येकी एक गुणाचे असतात. त्याचे नियम आयसीसीच्या प्लेईंग कंडीशन्समध्ये स्पष्ट केले आहेत. हेही वाचा - Paris Olympic 2024: भारताच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत रचला इतिहास, ऐतिहासिक विजयासह ५२ वर्षांचा दुष्काळ संपवला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अनिर्णित राहिलेले सामनेवेस्ट इंडिज : ११भारत: १०ऑस्ट्रेलिया: ९इंग्लंड : ९पाकिस्तान : ९झिम्बाब्वे: ८ पहिल्या वनडेत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. शिवम दुबे आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून टीम इंडियाची धावसंख्या बरोबरीत आणलीली, पण ४८व्या षटकात दुबेला चरित असलंकाने पायचीत केले. यानंतर भारतीय संघाला विजयासाठी फक्त १ धावेची गरज होती, मात्र पुढच्याच चेंडूवर अर्शदीप सिंग बाद झाला. अशाप्रकारे भारतीय संघ हा एका धावेसाठी सामना जिंकू शकला नाही. आता दुसरा सामना याच मैदानावर ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.