तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३१७ धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३९१ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ७३ धावांवर गारद झाला. त्यामुळे हा विजय एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. या ऐतिहासिक विजयासह भारताने श्रीलंकेचा मालिकेत ३-० असा धुव्वा उडवला.

मैदानावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला, पण या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांचा उत्साह कमीच होता. सामन्यादरम्यान जवळपास अर्धे स्टेडियम रिकामे दिसले. अशा परिस्थितीत एकदिवसीय क्रिकेटकडे लोकांची आवड कमी होत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही एकदिवसीय क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली.

Dinesh Karthik makes history against KKR Match
KKR vs RCB : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

युवराज सिंगने ट्विटरवर लिहिले, ”शुभमन गिल चांगला खेळला, आशा आहे कोहली शतक करेल. दुसऱ्या बाजूला फलंदाजी मजबूत दिसत आहे! मला काळजी वाटते की अर्धे स्टेडियम रिकामे आहे? वनडे क्रिकेट मरत आहे का?”

यापूर्वी, २०१८ मध्ये तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता, तेव्हा पावसाचा व्यत्यय असूनही स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. परंतु यावेळी स्थानिक प्रेक्षकांच्या गर्दी कमी असल्यामुळे ते रिकामे दिसत होते.
या स्टेडियममध्ये ३८,००० प्रेक्षकांची आसन क्षमता आहे. मात्र, रविवारी सामना पाहण्यासाठी फक्त १७,००० प्रेक्षक आले होते. ज्यामुळे अर्धे स्टेडियम रिकामे होते. केरळ क्रिकेट असोसिएशनचे मीडिया मॅनेजर कृष्णा प्रसाद यांनी याचे कारण वनडेमध्ये रस नसणे यासह अनेक कारणे सांगितले आहेत.

प्रेक्षक स्टेडियममध्ये का आले नाहीत?

कृष्णा प्रसाद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आम्ही कधीही अर्धे रिकामे स्टेडियम पाहिले नाही. याची अनेक कारणे आहेत. आता एकदिवसीय सामन्यांमधली अनेकांची आवड आम्हाला दिसत नाही. आणि वर कोलकाता मालिकेचा निकालही लागला होता, ज्यामध्ये भारताने २-० अशी अजेय आघाडी घेतली होती. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघही श्रीलंका होता, त्यामुळे बहुतेक लोक स्टेडियममध्ये आले नाहीत. तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांची किंमत १००० आणि २००० रुपये होती.

हेही वाचा – VIDEO: विराट आणि शुबमन गिलने आपल्या यशाचे श्रेय ‘या’ तीन सदस्यांना दिले, पाहा कोण आहेत?

गुवाहाटी वनडेतही अशीच अवस्था होती –

प्रसाद पुढे म्हणाले, ”वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यादरम्यान एकही तिकीट शिल्लक नव्हते. हा सामना पावसाने प्रभावित झाला होता आणि सामन्याची पूर्ण ५० षटकेही पूर्ण झाली नव्हती, तरीही स्टेडियम लोकांनी खचाखच भरले होते.” पाहिलं तर या संपूर्ण मालिकेत ईडन गार्डन वगळता फारच कमी प्रेक्षक सामना पाहायला आले होते. कोलकाता येथे ५५००० लोकांनी सामना पाहिला. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गुवाहाटीला पोहोचले, पण तिथेही स्टेडियम भरलेले नव्हते. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमची क्षमता ३८,००० प्रेक्षकांची आहे, ज्यापैकी फक्त २५,००० प्रेक्षक उपस्थित होते.

हेही वाचा – IND vs SL: विराटला भेटण्यासाठी चाहता मैदानात घुसला अन्… सुरक्षा कर्मचारी आणि खेळाडू पाहतच राहिले; पाहा VIDEO

एकदिवसीय क्रिकेट खरोखरच संपत आहे का?

गेल्या वर्षी इंग्लिश क्रिकेटपटू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला, तेव्हापासून ५० षटकांच्या या फॉरमॅटबद्दल चर्चा सुरू झाली. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी द्विपक्षीय मालिका कमी करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने एकदिवसीय क्रिकेट आता पूर्णपणे बंद केले पाहिजे, असे म्हटले होते.