जेव्हा भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान फलंदाज चारिथ असलंकाला बाद करण्यासाठी अप्रतिमरित्या मागे धाव घेत आणि डायव्हिंग करत झेल घेतला तो क्षण सर्वांना अगदी ठळकपणे लक्षात राहण्यासारखा होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना किशन (३७), हार्दिक पंड्या (२९), दीपक हुडा (४१*) आणि अक्षर पटेल (३१*) यांनी अंतिम षटकांत १६२/५ धावा केल्या.

त्याच्या बदल्यात, शिवम मावीने एकदिवसीय पदार्पणात २२ धावा देत ४ गडी बाद करत श्रीलंकेला अडचणीत आणले. कर्णधार दासुन शनाकाने ४५ धावा करून श्रीलंकेला ट्रॅकवर आणले आणि त्यानंतर चमिका करुणारत्नेने २३* धावा करून श्रीलंकेला लक्ष्याच्या अगदी जवळ आणले. उमरान मलिक हा देखील भारताच्या विजयातील एक तारा होता कारण त्याने शनाका आणि त्याच्या आधी चरिथ असलंका यांच्या विकेट घेतल्या होत्या.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: पंजाबने ‘चुकून’ खरेदी केलेला शशांक सिंग ठरला विजयाचा नायक, वाचा लिलावात नेमकं काय झालं होतं?

असलंकाने उमरानच्या एका लेन्थ बॉलचा शॉर्ट खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त टॉप एज लागून हवेत उंच गेला. चेंडू फाइन लेग बाऊंड्रीकडे उडाला, पण विकेट कीपिंग करणार्‍या इशान किशनने चित्त्यासारखा त्याचा पाठलाग केला आणि अप्रतिमरित्या तो पकडला. हा झेल पाहून कर्णधार हार्दिक पांड्या आश्चर्यचकित झाला आणि वानखेडे स्टेडियममध्ये हजारो लोकांनी त्या क्षणाला जल्लोष केला. रोमहर्षक विजयानंतर बीसीसीआयच्या व्हिडिओ मध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्याशी बोलताना इशान किशनने उघड केले की डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या चुकांमधून संघ शिकला आणि उंच झेल घेण्यासाठी प्रशिक्षणादरम्यान कठोर परिश्रम घेतले.

व्हिडिओ मध्ये बोलताना किशन म्हणाला की, “मला वाटतं आम्ही बांगलादेशमध्ये खेळत असताना काही झेल पाहिले आहेत जे कॉलिंगमुळे, कॉल करताना योग्य आवाज नसल्यामुळे आम्ही चुकलो. त्यामुळे मला वाटलं की जेव्हा मी झेल घ्यायला जातो तेव्हा मी आऊट करू शकणार नाही, मी संभ्रम निर्माण करेन.म्हणून मी कॉल केला.आम्ही सराव करत असतानाही मी प्रशिक्षकांशी चर्चा करत होतो की कॉल करणे खूप महत्वाचे आहे.म्हणून आम्ही हा सराव केला आणि टेनिस रॅकेट आणि सॉफ्ट बॉल्सने उंच झेल पकडण्याचा सराव केला आणि हे सर्व कष्टाचे फळ मिळाले.”  

फिल्डिंग कोच टी दिलीप यांनीही इशानचे कौतुक केले. ते म्हणाले, “मागे धावताना झेल पकडणे खूप कठीण आहे. आम्हा सर्वांना माहित आहे की तुमचा वेग चांगला आहे. तो एक शानदार झेल होता.” भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना गुरूवार, ५ जानेवारी रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.